(मुलाणी,खुटबाव)
दहिवडी (ता. माण, जि. सातारा) -बिजवडी गावच्या हद्दीत प्रतिक ढाब्याच्या उत्तरेस सुमारे 500 मीटर अंतरावर माळरानात एका पुरुषाचा मृतदेह फुगलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. ही घटना 17 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजता उघडकीस आली.मयत व्यक्तीचे नाव आनंदा निवृत्ती दडस (वय 39, रा. पांगरी, ता. माण, जि. सातारा) असे असून, मृत्यूचे कारण अद्याप अज्ञात आहे. या घटनेची माहिती नातेवाईकांकडून मिळाल्यानंतर फिर्यादी शिवाजी लक्ष्मण कोकरे यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद (अकस्मात रजि. नं. 41/2025, कलम 194 B.N.S.S. प्रमाणे) केली आहे.सदर घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार व्ही. डी. विरकर (ब.नं. 255) करत असून, मा. सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी सुरू आहे. मृतदेहाचे पोस्टमॉर्टम व ईन्क्वेस्ट पंचनामा तजवीज ठेवण्यात आलेले असून, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची प्रतीक्षा आहे. बिजवडी परिसरात रहस्यमय मृत्यू- माळरानात फुगलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह आढळला!