दिनांक 01/11/2025 वार शनिवार (मुख्य संपादक- नजीर मुलाणी )
/मुलाणी, खुटबाव/
दहिवडी (ता. माण, जि. सातारा) –
दहिवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गोंदवले खुर्द येथील ढोनीचा ओढा पोळ वस्ती परिसरात एका युवकाचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळून आला आहे. या घटनेची नोंद दहिवडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर क्र. 43/2025 प्रमाणे बी.एन.एस.एस. कलम 194 अन्वये करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयताचे नाव जाकीर ताजुद्दीन मुलाणी (वय 35 वर्ष, रा. गोंदवले खुर्द, ता. माण, जि. सातारा) असे असून, फिर्यादी म्हणून पायल हुसेन मुलाणी (वय 32 वर्षे, व्यवसाय – घरकाम, रा. पळशी, ता. माण) यांनी दहिवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
ही घटना दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजीच्या रात्री (नक्की वेळ माहित नाही) ते 31 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत घडल्याचे सांगितले जाते. मृतदेह जनार्दन पोळ यांच्या घरामागे, ढोनीचा ओढा पोळ वस्ती, गोंदवले खुर्द येथे आढळून आला.
मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. प्राथमिक तपासानुसार पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पोस्टमॉर्टमची तजवीज ठेवली आहे.
या घटनेचा तपास पोलीस हवालदार आर. पी. खाडे (मो. नं. 8668385562) करत आहेत.
घटनास्थळी मा. सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे (मो. नं. 9420025780)
तसेच पोलीस नाईक एस. एस. म्हामणे (मो. नं. 9594971585) यांनी भेट देऊन पाहणी केली.
पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून मृत्यूचे कारण स्पष्ट होण्यासाठी पोस्टमॉर्टम अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे.
------------------------------------------------------------------------