मुलाणी
कुळकजाई गावात शेतात इसमाचा खून – अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
माण:- सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील कुळकजाई गावात घडलेल्या खुनाच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दिलीप घाडगे यांच्या शेतात एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून, दहिवडी पोलिस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दहिवडी पोलिस ठाण्यात दाखल गु. र. नं. 406/2025, बी. एन. एस. कलम 103(1) नुसार, हा गुन्हा खून करण्याच्या उद्देशाने केल्याची नोंद करण्यात आली आहे.
फिर्यादी रेश्मा रमेश इंगळे (वय 40, व्यवसाय शेती, रा. कुळकजाई ता. मान) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादींचे पती रमेश मारुती इंगळे (वय 51) हे 4 नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे 9.30 वाजता “गावात जाऊन येतो” असे सांगून घराबाहेर गेले, मात्र त्यानंतर ते परतले नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळपासून त्यांनी शोध घेतला, पण ते सापडले नाहीत.
संध्याकाळी फिर्यादींच्या पुतण्याने माहिती दिली की, रमेश इंगळे यांचा मृतदेह बौद्ध स्मशानभूमी जवळ दिसला आहे. तेथे पोहोचल्यावर इंगळे हे पालथे अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर दगडाने ठेचल्याचे स्पष्ट दिसून आले.
प्राथमिक चौकशीत असे समजते की, रात्री रमेश इंगळे यांनी दारू सेवन करून गावातील बौद्ध वस्तीत बडबड केली होती. त्यानंतर रात्री सुमारे 10.30 वाजता गावातील शुभम चव्हाण हा त्यांना स्मशानभूमीकडे नेताना काही गावकऱ्यांनी पाहिले होते. पोलिस या दृष्टीने तपास सुरू आहे.
या घटनेची माहिती मिळताच मा. रणजीत सावंत, उपविभागीय पोलीस अधिकारी (दहिवडी कॅम्प वडूज) यांनी घटनास्थळी भेट दिली.
तपासाचे काम सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय परशुराम दराडे (मो. 9860225780) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, पुढील तपास सुरु आहे.
📍दहिवडी पोलीस ठाणे – जिल्हा सातारा
📞 दाखल अंमलदार: एस. ए. वावरे (पो. हवा. ब. न. 2123) – 9420065636
📞 तपास अधिकारी: दत्तात्रय दराडे (API) – 9860225780