दि.२८/१/२०२६वार -बुधवार (मुख्य संपादक -नजीर मुलाणी)
(मुलाणी, वसई)
वसई: - वसई तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे गंभीर आरोप सध्या चर्चेत आले असून, दरमहा सुमारे 50 लाख रुपयांची बेकायदेशीर वसुली होत असल्याचा दावा काही माध्यमे व नागरिकांमध्ये केला जात आहे. या आरोपांमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.रेशन कार्ड नवीन काढणे, नाव कमी करणे नवीन टाकने आणि धान्य बंद–सुरू करणे आदी कामांसाठी दलाल, महा ई- सेवा केंद्र आणि काही कर्मचारी यांचे साटेलोटे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तहसील कार्यालयात अधिकृत वेळेनंतर म्हणजेच सायंकाळी पाचनंतरही काही कामे होत असल्याचे आरोप असून, याला जबाबदार नेमके कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.या प्रकरणात पुरवठा निरीक्षक अधिकारी भागवत सोनार यांच्यावरही थेट आरोप होत असले तरी, त्यांनी हे सर्व आरोप ठामपणे फेटाळले आहेत. “माझी बदनामी करण्यासाठी माझ्यावर आरोपांची लाईन लावण्याची सुपारी देण्यात आली आहे,” असे म्हणत त्यांनी आरोप खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे.दरम्यान, तहसील कार्यालयात CCTV कॅमेरे कार्यरत असताना देखील दलाल खुलेआम कागदपत्रे घेऊन फिरत असतील, तर ते कसे आणि कुणाच्या माध्यमातून काम करतात, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे. कॅमेऱ्यांच्या फुटेजच्या आधारे कोण दलाल आहेत, कोणत्या वेळेत कार्यालयात ये-जा होते, आणि नेमकी कामे कशी केली जातात, हे स्पष्ट होऊ शकते, असे नागरिकांचे म्हणणे आहे.जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर मासिक वसुलीचे आरोप लागत असतील, तर माध्यमांसमोर खुली पत्रकार परिषद घेऊन वस्तुस्थिती मांडावी आणि दोषी दलालांवर कठोर कारवाई करावी, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अन्यथा, हे आरोप खरे ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा सुरू आहे.या संपूर्ण प्रकरणात अधिकारी दोषी आहेत की दलाल, की महा ई-सेवा केंद्र, याचा निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीअंतीच स्पष्ट होईल. गोरगरीब नागरिकांना रेशनपासून वंचित ठेवून लूट केली जात असेल, तर शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.सध्या हे सर्व आरोप–प्रत्यारोपाच्या पातळीवर असले तरी, सखोल चौकशी झाल्यास वसई तालुक्यातील पुरवठा व्यवस्थेतील खरा भ्रष्टाचार उघड होऊ शकतो, असे बोलले जात आहे.
No comments:
Post a Comment
Thanks for your