सफाई मित्र अॅप”मुळे सफाई व्यवस्था डिजिटल; 24 तासांत तक्रार निवारण बंधनकारक, अन्यथा 10,000 रुपयांचा दंड - All India News Mulani . online

All India News Mulani . online

All India News Mulani


ऑल इंडिया न्यूज हिन्दी एवं मराठी में ऑनलाइन समाचार

33-0138922 नं .उदयम महा

All India News S M S कलेक्शन, भाईंदर ( ईस्ट ) BP रोड रेल्वे स्टेशन के बाजु में प्रशांत हॉटेल, सुरभी के सामने, मेडीकल के बाजु मे ( शाहरुख मुलाणी- mob.7021052733 ) . NEWS WEBSITE,, YouTube channel,, NGO,, संबंधित सभी सेवाएं प्रदान करते है , सेवाएं लेने के लिए व्हाट्सअप किजिए 7378342192, ZARA DIGITAL MARKETING

Editor : -Nazir Mulani con.8796706999

Nazir Mulani ऑल इंडिया न्यूज

Wednesday, March 25, 2026

सफाई मित्र अॅप”मुळे सफाई व्यवस्था डिजिटल; 24 तासांत तक्रार निवारण बंधनकारक, अन्यथा 10,000 रुपयांचा दंड

दिनांक 25 मार्च 2026 वार बुधवार ( मुख्य संपादक -नजीर मुलाणी ,वसई)
( मुलाणी ,वसई)
“सफाई मित्र अॅप”मुळे सफाई व्यवस्था डिजिटल; 24 तासांत तक्रार निवारण बंधनकारक, अन्यथा 10,000 रुपयांचा दंड
वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक पारदर्शक व प्रभावी करण्यासाठी “सफाई मित्र अॅप”ची 10 मार्च 2026 पासून सुरुवात करण्यात आली आहे. या डिजिटल उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांचा थेट सहभाग वाढवून स्वच्छता व्यवस्थेला अधिक बळकटी देणे हा आहे.
या अॅपच्या माध्यमातून आता नागरिकांना त्यांच्या परिसरातील कचरा न उचलणे, कचरा गाडी न येणे, उशिरा कचरा उचलणे किंवा अनियमित कचरा संकलन अशा समस्या त्वरित नोंदवता येणार आहेत. त्यामुळे संबंधित विभागाला तत्काळ कारवाई करणे सोपे होणार असून समस्यांचे जलद निवारण होण्यास मदत होणार आहे.
महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, अॅपवर नोंदवलेल्या प्रत्येक तक्रारीचे निवारण ठेकेदारांकडून 24 तासांच्या आत करणे बंधनकारक राहील. जर निर्धारित वेळेत तक्रार निकाली काढली नाही, तर संबंधित ठेकेदारावर प्रति तक्रार 10,000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या अॅपवर एकूण 464 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 100 टक्के तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. यामुळे या प्रणालीची प्रभावीता स्पष्ट होत आहे.
यासंदर्भात मनपा आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या अॅपचा जास्तीत जास्त वापर करून आपल्या परिसराला स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा.
महानगरपालिकेच्या मते, “सफाई मित्र अॅप” नागरिक आणि प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

No comments:

Post a Comment

Thanks for your