वसई-विरारमध्ये रुग्णालयात आढळलेल्या कालबाह्य औषध प्रकरणाची चौकशी पूर्ण; जबाबदारांना नोटीस - All India News Mulani . online

All India News Mulani . online

All India News Mulani


ऑल इंडिया न्यूज हिन्दी एवं मराठी में ऑनलाइन समाचार

33-0138922 नं .उदयम महा

All India News S M S कलेक्शन, भाईंदर ( ईस्ट ) BP रोड रेल्वे स्टेशन के बाजु में प्रशांत हॉटेल, सुरभी के सामने, मेडीकल के बाजु मे ( शाहरुख मुलाणी- mob.7021052733 ) . NEWS WEBSITE,, YouTube channel,, NGO,, संबंधित सभी सेवाएं प्रदान करते है , सेवाएं लेने के लिए व्हाट्सअप किजिए 7378342192, ZARA DIGITAL MARKETING

Editor : -Nazir Mulani con.8796706999

Nazir Mulani ऑल इंडिया न्यूज

Wednesday, March 25, 2026

वसई-विरारमध्ये रुग्णालयात आढळलेल्या कालबाह्य औषध प्रकरणाची चौकशी पूर्ण; जबाबदारांना नोटीस

दिनांक 25 मार्च 2026 वार बुधवार( मुख्य संपादक -नजीर मुलाणी ,वसई) 
(मुलाणी ,वसई )वसई-विरारमध्ये रुग्णालयात आढळलेल्या कालबाह्य औषध प्रकरणाची चौकशी पूर्ण; जबाबदारांना नोटीस
वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या प्रेस नोटनुसार, दिनांक ६ मार्च २०२६ रोजी सर डी.एम. पेटीट रुग्णालयात कालबाह्य (एक्सपायरी) औषधांचा साठा आढळल्याची बाब समोर आली होती. या गंभीर प्रकरणाची दखल घेत महानगरपालिका आयुक्तांनी तात्काळ चौकशी समितीची स्थापना केली होती.
या समितीचे अध्यक्षपद अतिरिक्त आयुक्त (उत्तर) दीपक सावंत यांनी भूषवले, तर मुख्य लेखापरीक्षक दिनकर जाधव, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी अभिजीत मेंगडे आणि उपआयुक्त (वैद्यकीय आरोग्य) स्वाती देशपांडे हे सदस्य म्हणून सहभागी होते.
समितीने रुग्णालयातील संपूर्ण औषध साठ्याची सखोल तपासणी केली असता सुमारे १० प्रकारची औषधे कालबाह्य असल्याचे आढळून आले. तसेच कालबाह्य औषधे आणि दीर्घकाळ वापरता येणारी औषधे एकाच ठिकाणी साठवून ठेवण्यात आल्याचेही निदर्शनास आले, जे गंभीर निष्काळजीपणाचे लक्षण असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली असून पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, प्रशासनाने स्पष्ट केले आहे की कालबाह्य औषधांचे वितरण कोणत्याही रुग्णांना करण्यात आलेले नाही. रुग्णालयातून देण्यात आलेली औषधे पूर्णपणे सुरक्षित होती आणि यासंदर्भात कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही.
महानगरपालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की या प्रकरणाबाबत कोणतीही भीती किंवा गैरसमज बाळगू नयेत. भविष्यात अधिक चांगल्या आरोग्य सेवा देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Thanks for your