छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत वसईत नऊ ठिकाणी शिबिरे; ७ मार्च ते १५ मे २०२६ दरम्यान आयोजन नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा : तहसीलदार दीपक गायकवाड यांचे आवाहन - All India News Mulani . online

All India News Mulani . online

All India News Mulani


ऑल इंडिया न्यूज हिन्दी एवं मराठी में ऑनलाइन समाचार

33-0138922 नं .उदयम महा

All India News S M S कलेक्शन, भाईंदर ( ईस्ट ) BP रोड रेल्वे स्टेशन के बाजु में प्रशांत हॉटेल, सुरभी के सामने, मेडीकल के बाजु मे ( शाहरुख मुलाणी- mob.7021052733 ) . NEWS WEBSITE,, YouTube channel,, NGO,, संबंधित सभी सेवाएं प्रदान करते है , सेवाएं लेने के लिए व्हाट्सअप किजिए 7378342192, ZARA DIGITAL MARKETING

Editor : -Nazir Mulani con.8796706999

Nazir Mulani ऑल इंडिया न्यूज

Wednesday, March 4, 2026

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत वसईत नऊ ठिकाणी शिबिरे; ७ मार्च ते १५ मे २०२६ दरम्यान आयोजन नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा : तहसीलदार दीपक गायकवाड यांचे आवाहन

दिनांक 4 मार्च 2026 वार -बुधवार( मुख्य संपादक- नजीर मुलाणी) वसई

 (नजीर मुलाणी,वसई)
वसई:-महसूल विभागाच्या वतीने ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांचे महसूलविषयक प्रश्न तात्काळ निकाली काढण्यासाठी आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्या उद्देशाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत वसई तालुक्यात नऊ ठिकाणी विशेष राजस्व शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.७ मार्च २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत ही शिबिरे भरविण्यात येणार असून नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन वसईचे तहसीलदार दीपक गायकवाड यांनी केले आहे.१५ प्रकारच्या महसूल सेवा एकाच ठिकाणीया शिबिरांमध्ये महसूल विभागाच्या एकूण १५ प्रकारच्या सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामध्ये —प्रलंबित फेरफार प्रकरणेसातबारा उताऱ्यातील दुरुस्तीडिजिटल सातबारा व ८-अ उतारा वाटपउत्पन्न, जात, रहिवासी प्रमाणपत्रनॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्रविद्यार्थ्यांना आवश्यक विविध दाखलेसनद प्रक्रियेबाबत मार्गदर्शनसामाजिक अर्थसाहाय्य लाभ योजना माहितीअकृषिक तरतुदी मार्गदर्शनतुकडेबंदी कायदा प्रकरणेपानंद रस्ते मान्यता आदेशघरपट्टे वाटपमोजणी अर्ज स्वीकारॲग्रीस्टॅक व पीएम किसान नोंदणीभूसंपादन नोंदी आदी सेवांचा समावेश आहे.नागरिकांना विविध कामांसाठी कार्यालयीन फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी या सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.शिबिरांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे७ मार्च – महावीर धाम जैन मंदिर (शिरसाट)९ मार्च – सेंट जोसेफ कॉलेज (नंदाखाल-कोपराड)१४ मार्च – अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्यामंदिर (विरार पूर्व)१६ मार्च – विश्वकर्मा हॉल (नवघर, वसई रोड पश्चिम)१० एप्रिल – तलाठी मंडळ अधिकारी कार्यालय (निर्मळ)१३ एप्रिल – जैन मंदिर (पोमन)१७ एप्रिल – एम. जी. परुळेकर हायस्कूल (वसई गाव)८ मे – मदर मेरी हायस्कूल (आचोळे)१५ मे – ग्राम महसूल कार्यालय (उमराळे)तहसीलदार दीपक गायकवाड यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, संबंधित कागदपत्रांसह शिबिरस्थळी उपस्थित राहून आपल्या महसूलविषयक अडचणी तत्काळ निकाली काढाव्यात व शासनाच्या या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Thanks for your