दिनांक 12 मार्च 2026 वार गुरुवार (मुख्य संपादक -नजीर मुलाणी,वसई)
( नजीर मुलाणी, वसई)
नालासोपारा, ता. ११ : नालासोपारा पश्चिम समेळपाडा परिसरातील महानगरपालिकेच्या आरक्षित सांडपाणी (वेटलँड) जागेवरून मोठ्या प्रमाणात गवत चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दररोज लाखो टन गवत कापून ते गुजरात व महाराष्ट्रातील मोठ्या तबेल्यांमध्ये लाखो रुपयांना विक्रीसाठी पाठवले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, या आरक्षित जागेवर सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंत कामगारांकडून गवत कापण्याचे काम सुरू असते. या कामासाठी कामगारांना दिवसाला सुमारे १,००० ते १,५०० रुपये मजुरी दिली जाते. त्यानंतर मोठ्या ट्रकमध्ये गवत भरून ते ५ ते १० रुपये प्रति किलो दराने विक्रीसाठी पाठवले जात असल्याचे सांगितले जाते.विशेष म्हणजे, गवत कापल्यानंतर ते पुन्हा लवकर वाढावे यासाठी पाणी देण्याची तसेच गवत वाढवण्याची सोयही करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकारात महानगरपालिकेतील काही अधिकारी तसेच नालासोपारातील काही प्रतिष्ठित व्यक्तींची नावेही पुढे येत असल्याचे सांगितले जात आहे.या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या रूचिताताई नाईक यांनी केली आहे.

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
No comments:
Post a Comment
Thanks for your