मा.महापौर यांच्या अध्यक्षतेखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाची आढावा बैठक संपन्न - All India News Mulani . online

All India News Mulani . online

All India News Mulani


ऑल इंडिया न्यूज हिन्दी एवं मराठी में ऑनलाइन समाचार

33-0138922 नं .उदयम महा

All India News S M S कलेक्शन, भाईंदर ( ईस्ट ) BP रोड रेल्वे स्टेशन के बाजु में प्रशांत हॉटेल, सुरभी के सामने, मेडीकल के बाजु मे ( शाहरुख मुलाणी- mob.7021052733 ) . NEWS WEBSITE,, YouTube channel,, NGO,, संबंधित सभी सेवाएं प्रदान करते है , सेवाएं लेने के लिए व्हाट्सअप किजिए 7378342192, ZARA DIGITAL MARKETING

Editor : -Nazir Mulani con.8796706999

Nazir Mulani ऑल इंडिया न्यूज

Thursday, March 12, 2026

मा.महापौर यांच्या अध्यक्षतेखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाची आढावा बैठक संपन्न

दिनांक 12/3/ 2026 वार गुरुवार ( मुख्य संपादक -नजीर मुलाणी, वसई) मो.नं.8796706999
मुलाणी ,वसई
दिनांक ११ मार्च २०२६ रोजी मा.महापौर श्री.अजीव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मा.महापौर दालनामध्ये मनपा घनकचरा व्यवस्थापन विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम आणि परिणामकारक करण्याच्या दृष्टीने विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच संबंधित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीमध्ये शहरातील दैनंदिन कचरा संकलन व्यवस्था, कचरा वर्गीकरण, रस्ते व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, तसेच कचरा वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. तसेच शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठा, सार्वजनिक स्थळे, शाळा परिसर, रुग्णालय परिसर आणि इतर गर्दीच्या भागांमध्ये नियमित स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश मा.महापौर महोदयांनी यावेळी दिले. गटारे, नाले आणि जलवाहिन्यांची नियमित साफसफाई करण्यात यावी, जेणेकरून पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या निर्माण होणार नाही, असेही निर्देशही यावेळी देण्यात आले. कचरा वेळेवर उचलला जावा यासाठी संबंधित विभागाने अधिक दक्षता घ्यावी तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर प्रभावी देखरेख ठेवण्याचेही निर्देश देण्यात आले. शहर स्वच्छतेसोबतच शहरात डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमित औषध फवारणी (फॉगिंग) योग्यरीत्या व वेळोवेळी करण्यात यावी तसेच साचलेल्या पाण्याच्या ठिकाणी अळीनाशक औषध टाकण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. स्वच्छता कर्मचाऱ्यांना आवश्यक साहित्य व साधनसामग्री उपलब्ध करून देणे, त्यांचे कामकाज नियमितपणे तपासणे तसेच कामात शिस्त व वेळेचे पालन यावर भर देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीत देण्यात आल्या. याशिवाय शहरात स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी विविध मोहिमा, शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रबोधन कार्यक्रम तसेच नागरिकांच्या सहभागातून स्वच्छता उपक्रम राबविण्याबाबतही चर्चा करण्यात आली. मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती होणाऱ्या गृहनिर्माण संस्था, हॉटेल्स, मॉल्स इ. ना ओला कचऱ्याचे जागेवर व्यवस्थापन करून त्याचे (खतनिर्मिती) कम्पोस्टिंग किंवा बायोगॅस प्रक्रीयेद्वारे विल्हेवाट करणे बाबत अधिकाधिक प्रचार करणेच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. या बैठकीस मा.महापौर श्री.अजीव पाटील, मा.उप-महापौर श्री.मार्शल लोपीस, मा.स्थायी समिती सभापती श्री.प्रविण शेट्टी, सभागृह नेते श्री.प्रफुल्ल साने, अतिरिक्त आयुक्त श्री.संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त श्री.दिपक सावंत, प्र.शहर अभियंता श्री.प्रदीप पाचंगे, सर्व सन्माननीय नगरसेविका-नगरसेवक, उप-आयुक्त (घनकचरा विभाग) श्रीम.अर्चना दिवे, सहा.आयुक्त (घनकचरा विभाग) श्री.जितेंद्र नाईक, सर्व स्वच्छता निरीक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते.
//////////////////////////////////////////////////////////////////////

No comments:

Post a Comment

Thanks for your