वसई- नायगाव येथे अज्ञात मृतदेह आढळल्याने खळबळ; ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे आवाहन - All India News Mulani . online

All India News Mulani . online

All India News Mulani


ऑल इंडिया न्यूज हिन्दी एवं मराठी में ऑनलाइन समाचार

33-0138922 नं .उदयम महा

All India News S M S कलेक्शन, भाईंदर ( ईस्ट ) BP रोड रेल्वे स्टेशन के बाजु में प्रशांत हॉटेल, सुरभी के सामने, मेडीकल के बाजु मे ( शाहरुख मुलाणी- mob.7021052733 ) . NEWS WEBSITE,, YouTube channel,, NGO,, संबंधित सभी सेवाएं प्रदान करते है , सेवाएं लेने के लिए व्हाट्सअप किजिए 7378342192, ZARA DIGITAL MARKETING

Editor : -Nazir Mulani con.8796706999

Nazir Mulani ऑल इंडिया न्यूज

Tuesday, March 24, 2026

वसई- नायगाव येथे अज्ञात मृतदेह आढळल्याने खळबळ; ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे आवाहन

दिनांक 24 मार्च 2026 ( मुख्य संपादक -नजीर मुलाणी, वसई)
 (नजीर मुलाणी)
नायगाव:-वसईत अज्ञात मृतदेह आढळल्याने खळबळ; ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे आवाहन
वसई : वसई पोलीस ठाणे हद्दीत अज्ञात मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना दिनांक 20 मार्च 2026 रोजी उघडकीस आली असून मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे वय अंदाजे 40 ते 45 वर्षांच्या दरम्यान असून मृतदेह कंकालसदृश स्थितीत आढळला. संबंधित व्यक्तीने अंडरवेअर व फुल जीन्स पॅन्ट परिधान केलेली होती. हा मृतदेह वसई येथील पांजू स्टॉप जवळ, खार्टन खांजन, नायगाव (पश्चिम) परिसरात सापडला.
या प्रकरणी वसई पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भवनेश्वर घनदाट हे करत आहेत.
दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, संबंधित मृत व्यक्तीबाबत कोणतीही माहिती असल्यास तात्काळ वसई पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
संपर्क क्रमांक : 9923871360

No comments:

Post a Comment

Thanks for your