(मुलाणी ,वसई)
दिनांक १६/०३/२०२६ रोजी वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती ‘जी’ वालीव व प्रभाग समिती ‘एफ’ पेल्हार मार्फत संयुक्त कारवाई करून अनधिकृत बांधकाम निष्कासीत करण्यात आले. दिनांक १६/०३/२०२६ रोजी प्रभाग समिती ‘जी’ वालीव अंतर्गत सातिवली तुंगारेश्वर परिसरातील २१००० चौ.फुटाचे २५८ पत्राशेडचे अनधिकृत बांधकाम निष्कासीत करण्यात आले. तसेच ५७०० चौ.फुटाचे ५७ बांबूशेड, ४६ हातगाड्या व ३२ टपऱ्या निष्कासीत करून सदरील परिसर मोकळा करण्यात आला. सदर मोहिमेत एकूण २६७०० चौ.फुट अनधिकृत बांधकाम निष्कासीत करण्यात आले. या कारवाई वेळी प्रभाग समिती ‘जी’ चे सहाय्यक आयुक्त श्री.निलेश म्हात्रे, अतिक्रमण विभाग प्रमुख श्री.मनोज घरत, लिपिक श्री.प्रमोद बर्वे, क.अभियंता मयुरेश पाटील व जितेश पाटील, सुरक्षा कर्मचारी व मजूर कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment
Thanks for your