(मुलाणी ,वसई)
परीक्षेच्या तोंडावर मुख्याध्यापिकेची अचानक बदली
वाघराळपाड्यात विद्यार्थी व पालकांचा संताप; शाळेला ठोकले टाळे
वसई :वसई पूर्वेतील वाघराळ पाडा येथे पहिली ते पाचवी अशी जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेमध्ये दोन शिक्षक असून येथील मुख्याध्यापिका ज्युली फर्नांडिस यांना शासनाने अचानक बदली झाल्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलवर पाठवल्याने व सदर बाब विद्यार्थी व पालकांना कळताच त्यांच्यात एकच संतापाचे वातावरण पसरल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, सध्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा तोंडावर असताना अशा पद्धतीने कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक बदली करणे नियमबाह्य असल्याचे मत पालकांनी व्यक्त करत ज्युली फर्नांडिस यांची बदली न करता त्यांची बदली रद्द करावी, असे सांगत विद्यार्थी व पालकांनी शाळेला टाळे ठोकले. तसेच शिक्षण विभागाकडून अशी अचानक मोबाईल संदेशाद्वारे बदली करणे नियमबाह्य असल्याचे पालकांनी सांगितले.
आधीच वाघराळ पाडा शाळेत दोन शिक्षिकांवर शाळेचा भार आहे. त्यात मुख्याध्यापिकेचीच बदली अचानक केली गेल्याने पालकांनी व विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करत शाळेलाच टाळे ठोकल्याचे चित्र दिसून आले.
दरम्यान, वाघराळपाडा येथील मुख्याध्यापिकेची नियमबाह्य बदली झाल्याचे कळताच येथील पालक व विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापिकेची बदली न करता त्याच मुख्याध्यापिका आम्हाला हव्या आहेत, अशी आग्रहाची मागणी यावेळी केली. शासनाच्या बदली आदेशाचा निषेध व्यक्त करत पालकांनी शाळेला कुलूप ठोकले. अचानक घेतलेल्या निर्णयांमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नियोजन बिघडणार असून त्यांच्यावर मानसिक ताण वाढेल अशी भीती पालकांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान,घटनेची माहिती मिळताच वसईचे गट विकास अधिकारी व शिक्षणाधिकारी यांनी तात्काळ वाघराळपाडा गाठून पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दरम्यान, या प्रकरणी चर्चा सुरू असल्याची माहिती मिळाली .
No comments:
Post a Comment
Thanks for your