दिनांक 27 मार्च 2026 वार शुक्रवार (मुख्य संपादक -नजीर मुलाणी, वसई )
(मुलाणी, वसई)
वसई-विरार :-वसई-विरार परिसरात गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेत होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाने आक्रमक भूमिका घेत आंदोलनाची घोषणा केली आहे.दिनांक २७ मार्च २०२६ रोजी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात AIMIM ने नमूद केले आहे की, मागील काही दिवसांपासून गॅस सिलेंडर वेळेवर मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. बुकिंग करूनही वेळेत सिलेंडर मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
पक्षाचे वसई-विरार शहरातील जबाबदार नेते अम्मार अब्दुल्ला पटेल यांनी सांगितले की, प्रशासनाने तात्काळ या समस्येकडे लक्ष देऊन तोडगा काढला नाही, तर जनतेच्या हितासाठी आंदोलन तीव्र करण्यात येईल.
याच पार्श्वभूमीवर AIMIM तर्फे दिनांक ३० मार्च २०२६ (सोमवार) रोजी दुपारी १२ वाजता, साई सिद्धी भारत गॅस एजन्सी, बिलाल पाडा, नालासोपारा पूर्व येथे जोरदार आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनाबाबत पोलिस प्रशासन व संबंधित गॅस एजन्सीला देखील माहिती देण्यात आली आहे. नागरिकांना वेळेत गॅस सिलेंडर मिळावा, अशी AIMIM ची मुख्य मागणी आहे.
⚠️ इशारा:
लवकरात लवकर समस्या मार्गी लावली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा AIMIM ने दिला आहे.
No comments:
Post a Comment
Thanks for your