(मुलाणी ,वसई)
वसई- विरार ता,१३ :- वसई विरार महानगरपालिका स्थायी समितीच्या वतिने यांनी २०२६–२७ या आर्थिक वर्षासाठीचा महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पाचे स्वागत करत सामाजिक कार्यकर्ती रूचिता नाईक यांनी हा अर्थसंकल्प वसई विरार तालुक्याचा विकासाला गती देणारा आणि सर्व घटकांसाठी आशादायी असल्याची प्रतिक्रिया दिली.सामाजिक कार्यकर्ती रूचिता नाईक यांनी कौतुक करत महापौर अजीव पाटील साहेब, स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी साहेब, उपमहापौर मार्शल लोपीस, आयुक्त सुर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प “विकसित वसई विरार २०३०” या ध्येयाकडे नेणारा महत्त्वाचा टप्पा आहे. अर्थसंकल्पात मागील वर्षीच्या तुलनेत १ हजार १४ कोटी २८ लाखाने वाढ करण्यात आली आहे.या अर्थसंकल्पात पर्यटनस्वच्छता उपक्रम, दिव्यांगांसाठी दिव्यांग पार्क आणि संविधान जनजागृतीसाठी संविधान पार्क उभारण्याची योजना या अर्थसंकल्पात आहे. याशिवाय चार नवीन अग्निशमन केंद्रे, बर्ड पार्क, रस्ते, फ्लायओव्हर, तसेच महापालिका कार्यालयांच्या विस्तारासाठीही निधी ठेवण्यात आला आहे. मालमत्ता कर व पाणीपट्टीत किरकोळ वाढ प्रस्तावित करण्यात आली असून या अर्थसंकल्पामुळे शहराच्या विकासाला चालना मिळेल,सादर केलेल्या अर्थसंकल्पात आरोग्य सुविधा, पाणी पुरवठा योजना, घनकचरा व्यवस्थापन, अग्निसुरक्षा, विद्युत व्यवस्था, पर्यावरण संवर्धन, रस्ते व इतर पायाभूत सुविधा, क्रीडा व सांस्कृतिक, पर्यटन विकास व अन्य नागरी सोयीसुविधा यांना केंद्रस्थानी ठेवून तयार केला असल्याने याचा फायदा नागरीकांना होणार आहे.शहरात शहर सौंदर्यीकरण, वाहतूक बेट, समाज मंदिर, नाट्यगृह, मार्केट, स्मशानभूमी, फुटपाथ, शहरांतर्गत रस्ते दुरुस्ती काँक्रिटीकरण, अशा विविध विकास कामासाठी सुमारे 1 हजार 792 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही तरतूद जवळपास 863 कोटींनी वाढविण्यात आली आहे.परिवहन उपक्रमाचा ८३ कोटी ५५ लाखांचा अर्थसंकल्प विविध घटकांसाठी सवलतीच्या योजना राबवण्यात आले आहेत.एमएमआरडीएच्या सुर्या योजनेतून महापालिकेला अतिरिक्त पाणी उपलब्ध झाले आहे. याचे वितरण नागरिकांपर्यँत व्हावे यासाठी अमृत योजने अंतर्गत शहरात जलवाहिन्या अंथरणे आणि जलकुंभ उभारणे.तसेच मालमत्ता कर व पाणीपट्टीत किरकोळ वाढ हि कमी करण्याचे आदेश महापौर यांनी दिले आहेत यांसारखे निर्णयही सकारात्मक असल्याचे सामाजिक कार्यकर्ती रूचिता नाईक यांनी सांगितले. वसई विरार शहरासह पालघर जिल्ह्यालाही या महत्वाकांक्षी अर्थसंकल्पाचा फायदा होणार आहे, एकंदरीतच वसई विरारला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेणारा हा अर्थसंकल्प ठरेल, याची खात्री असल्याचे रूचिता नाईक यांनी सांगितले
No comments:
Post a Comment
Thanks for your