::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;
वसई (मुलाणी) :नायगाव पूर्व परिसरातील कांदळवनांवर होत असलेल्या अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रेतीबंदरजवळील सर्वे क्रमांक २०९ या जागेवर मोठ्या प्रमाणात कांदळवन तोड करून अतिक्रमण केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ही जागा महसूल व वन विभागाच्या अखत्यारित येते. मात्र एका परप्रांतीय व्यक्तीकडून या परिसरातील कांदळवनांची मोठ्या प्रमाणात तोड करण्यात आल्याचे समोर आले आहे. झाडांची कत्तल करून जागा मोकळी करण्याचा प्रकार सुरू असल्याने पर्यावरणीय नुकसान होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, काही दिवसांपूर्वी वसईच्या आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी या परिसराची पाहणी केली होती. त्यावेळी कांदळवनांची तोड झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधित जागेवरील माती भराव व अतिक्रमण हटवण्याचे तसेच जबाबदारांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते.मात्र पाहणी दौऱ्यानंतरही परिस्थितीत फारसा बदल झालेला नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. आमदारांच्या निर्देशांनंतरही संबंधित ठिकाणी पुन्हा साफसफाई करून जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.या प्रकरणी महसूल आणि वन विभागाने पंचनामा केल्याची माहिती मिळत असली तरी प्रत्यक्षात अतिक्रमण रोखण्यासाठी ठोस कारवाई होत नसल्याची नाराजी स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे. सामाजिक कार्यकर्ते एलायस डिसिल्वा यांनीही प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.दरम्यान, संबंधित जागा डम्पिंग ग्राउंडसाठी आरक्षित असल्याचे सांगितले जात असून यापूर्वीही त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणात प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
No comments:
Post a Comment
Thanks for your