“मनसेचा नव्या जोमात झंकार! महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडून राज्यभर जिल्हा संपर्कप्रमुखांची मोठी नियुक्ती”
विशेष रिपोर्ट | नजीर मुलाणी
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे संस्थापक अध्यक्ष- राजसाहेब ठाकरे यांनी पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी राज्यभरात मोठा निर्णय घेत जिल्हा संपर्कप्रमुखांची नियुक्ती जाहीर केली आहे. या नियुक्त्यांमुळे पक्षाचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचवण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
सध्या शहरातील पदाधिकारी, गटप्रमुख आणि कार्यकर्त्यांपर्यंत पक्षाची भूमिका व धोरणे प्रभावीपणे पोहोचत नसल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांना जनतेचे प्रश्न मांडताना अडचणी येत असल्याचे चित्र दिसत होते. याच समस्यांवर तोडगा म्हणून जिल्हा संपर्कप्रमुखांची नेमणूक करण्यात आली आहे.
काय असेल संपर्कप्रमुखांची भूमिका?
नवीन नियुक्त संपर्कप्रमुख हे जिल्हा स्तरावर पक्ष आणि कार्यकर्त्यांमधील ध्रुवा म्हणून काम करणार आहेत.
शहर व तालुका स्तरावरील पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद
कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवणे
जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे
पक्षाची धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवणे
या निर्णयामुळे जिल्हा पातळीवरील संघटन अधिक मजबूत होणार असून शहरातील पदाधिकाऱ्यांचे मनोबलही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मनसे पुन्हा आक्रमक मोडमध्ये!
या नियुक्त्यांमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आक्रमक भूमिकेत दिसणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पक्षाची ताकद वाढवण्यासोबतच कार्यकर्त्यांना नवसंजीवनी मिळणार आहे.
जनतेच्या प्रश्नांवर फोकस
नवीन रचनेमुळे जनतेचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातील आणि त्यावर जलद तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे “जनतेचा आवाज” अधिक बळकट होणार असल्याचे मानले जात आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडून जाहीर करण्यात आलेल्या जिल्हा संपर्क अध्यक्षांची संपूर्ण यादी
जिल्हाअधिकृत नियुक्ती यादी
सिंधुदुर्ग – श्री. शिरीष सावंत, श्री. संदीप दळवी
रत्नागिरी – श्री. नितीन सरदेसाई, श्री. शिरीष सावंत
रायगड – श्री. संदीप देशपांडे, श्री. योगेश परूळेकर, श्री. राजेश येरूणकर
ठाणे – श्री. मनोज चव्हाण, श्री. संजय नाईक
पालघर – श्री. प्रमोद (राजू) पाटील, श्री. केतन नाईक
लातूर – श्री. दिलीप धोत्रे
छत्रपती संभाजीनगर – श्री. बाळा नांदगावकर, श्री. विनायक म्हशिलकर, श्री. दिलीप चितलांगे, श्री. बिपिन नाईक
जालना – श्री. जयप्रकाश बाविस्कर
नांदेड – श्री. संतोष नागरगोजे, श्री. सतनामसिंग गुलाटी
धाराशिव – श्री. राजेंद्र (बाबू) वागसकर
पुणे – श्री. अमित ठाकरे, श्री. अविनाश अभ्यंकर, श्री. अमेय खोपकर
सोलापूर – अॅड. किशोर शिंदे, अॅड. सुधीर पाटसकर
सातारा – श्री. गणेश सातपुते, श्री. रणजित शिरोळे
कोल्हापूर – श्री. यशवंत किल्लेदार, श्री. नंदकुमार चिले
धुळे – श्री. प्रकाश भोंईर
नंदुरबार – श्री. कर्णबाळा दुनबळे
जळगाव – श्री. संदीप पाचंगे, श्री. आशिष साबळे
नाशिक – श्री. अविनाश जाधव, श्री. अभिजीत पानसे
अहिल्यानगर – श्री. नयन कदम
अमरावती - श्री .राजू उंबरकर
नागपूर - श्री. हेमंत संभूस
अकोला - श्री . हेमंत गडकरी
यवतमाळ - श्री . प्रशांत कनोजिया
बुलढाणा - श्री . बाळा शेडगे
आणि उर्वरित जिल्हाच्या संपर्क अध्यक्षांची यादी लवकरच जाहीर करण्यात येईल
या संघटनात्मक बदलामुळे मनसेला नवसंजीवनी मिळणार असून राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा प्रभावी अस्तित्व निर्माण करण्यासाठी हा मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो.
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
No comments:
Post a Comment
Thanks for your