७ लाखांची लाच घेताना रंगेहात पकडला खाजगी कर्मचारी; वसई अपर तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्याचीही चौकशी सुरू - All India News Mulani . online

All India News Mulani . online

All India News Mulani


ऑल इंडिया न्यूज हिन्दी एवं मराठी में ऑनलाइन समाचार

33-0138922 नं .उदयम महा

All India News S M S कलेक्शन, भाईंदर ( ईस्ट ) BP रोड रेल्वे स्टेशन के बाजु में प्रशांत हॉटेल, सुरभी के सामने, मेडीकल के बाजु मे ( शाहरुख मुलाणी- mob.7021052733 ) . NEWS WEBSITE,, YouTube channel,, NGO,, संबंधित सभी सेवाएं प्रदान करते है , सेवाएं लेने के लिए व्हाट्सअप किजिए 7378342192, ZARA DIGITAL MARKETING

Editor : -Nazir Mulani con.8796706999

Nazir Mulani ऑल इंडिया न्यूज

Wednesday, April 22, 2026

७ लाखांची लाच घेताना रंगेहात पकडला खाजगी कर्मचारी; वसई अपर तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्याचीही चौकशी सुरू

दिनांक२२/४/२०२६ वार बुधवार (मुख्य संपादक -नजीर मुलाणी)
स्कैन करा न्यूज पहा
 (मुलाणी, वसई)
वसई- भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी), ठाणे यांनी वसई तालुक्यात ७ लाख रुपयांची लाच स्वीकारताना एका बाह्य कर्मचाऱ्याला रंगेहात पकडले. ही लाच अपर तहसीलदार कार्यालयाशी संबंधित प्रकरण निकाली काढण्यासाठी मागण्यात आल्याचे समोर आले असून संबंधित अधिकाऱ्याच्या भूमिकेचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे.प्राप्त माहितीनुसार, तक्रारदाराच्या जमिनीवरील कथित अनधिकृत बांधकामाचे प्रकरण निकाली काढण्यासाठी आरोपीने सुरुवातीला १० लाख रुपयांची मागणी केली होती. नंतर चर्चेनंतर ही रक्कम ७ लाख रुपयांवर ठरली. यानंतर तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्र येथे तक्रार दाखल केली.तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर एसीबीने २१ एप्रिल २०२६ रोजी सापळा रचला. या कारवाईदरम्यान खाजगी इसम अनिल प्रभाकर चौबल (बाह्य कर्मचारी) याने तक्रारदाराकडून ७,००,००० रुपये स्वीकारताच पंचांच्या उपस्थितीत एसीबी पथकाने त्याला रंगेहात पकडले.प्राथमिक चौकशीत ही लाच अपर तहसीलदार (अव्वल) कार्यालयात प्रलंबित असलेले प्रकरण निकाली काढण्यासाठी मागण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. या संदर्भात विनोद बालकृष्ण धोत्रे (अपर तहसीलदार – अव्वल, वसई) यांच्या भूमिकेचीही चौकशी सुरू आहे.या प्रकरणात मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालय क्षेत्रात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक रुपाली पोळ (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच शिवराज पाटील (पोलीस अधीक्षक, एसीबी ठाणे), सुहास शिंदे (अपर पोलीस अधीक्षक, एसीबी ठाणे) आणि भागवत सोनावणे (अपर पोलीस अधीक्षक, एसीबी ठाणे) यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा यशस्वीपणे राबविण्यात आला.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी लाच मागितल्यास तात्काळ तक्रार करावी. तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असे विभागाने स्पष्ट केले आहे.
::::;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;:::::;:;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;::::::::::;;;:;;:::    ;;::::::::

No comments:

Post a Comment

Thanks for your