ग्रामीण पट्ट्यातील नगरसेवकांची दातखिळी बसली की काय?-एलायन डिसिल्वा - All India News Mulani . online

All India News Mulani . online

All India News Mulani


ऑल इंडिया न्यूज हिन्दी एवं मराठी में ऑनलाइन समाचार

33-0138922 नं .उदयम महा

All India News S M S कलेक्शन, भाईंदर ( ईस्ट ) BP रोड रेल्वे स्टेशन के बाजु में प्रशांत हॉटेल, सुरभी के सामने, मेडीकल के बाजु मे ( शाहरुख मुलाणी- mob.7021052733 ) . NEWS WEBSITE,, YouTube channel,, NGO,, संबंधित सभी सेवाएं प्रदान करते है , सेवाएं लेने के लिए व्हाट्सअप किजिए 7378342192, ZARA DIGITAL MARKETING

Editor : -Nazir Mulani con.8796706999

Nazir Mulani ऑल इंडिया न्यूज

Saturday, April 25, 2026

ग्रामीण पट्ट्यातील नगरसेवकांची दातखिळी बसली की काय?-एलायन डिसिल्वा


दिनांक 25 एप्रिल 2026 वार शनिवार (मुख्य संपादक- नजीर मुलाणी, वसई )
(मुलाणी, वसई)
दिनांक २३ एप्रिल रोजी महानगर पालिकेची महासभा पार पडली. महासभेत लोकप्रतींनिधींनी आपल्या प्रभागातील विविध समस्यांविषयी सभेचे लक्ष वेधून त्यावर तातडीने उपाययोजना राबवण्याबाबत चर्चा करणे अपेक्षित असते. विशेषत: ग्रामीण पट्ट्यातील मागील कित्येक वर्षांपासून प्रलंबित पाणीप्रश्नाबाबत सदर सभेत आपल्या पश्चिम पट्ट्यातील नगरसेवकांनी एकजूट दाखवित प्रशासनाला धारेवर धरणे आवश्यक होते. दुर्दैवाने पश्चिम पट्ट्यातील आपले नगरसेवक मूग गिळून बसले होते. आपल्या पश्चिम पट्ट्यात पाण्याचा प्रश्न किती गंभीर आहे हयाविषयी आपल्याला माहीत आहे. मागील १५ वर्षांपासून पाण्याच्या टाक्या रिकाम्या उभ्या आहेत. मागील १५ वर्षांत तीन ते चार वेळा पाइप टाकले पण त्यामधून पाणी आपल्या घरपर्यंत कधी आले नाही. त्याचवेळी या कालावधीत महापलिकेच्या सत्ताधार्‍यांनी आपल्या मर्जीतील मोजक्या बिल्डरांच्या इमारतींना पाणी दिले आणि आपला ग्रामीण भाग मात्र तहानलेला सोडला. नगरसेवक हे स्थानिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी असतात. त्यांनी महापालिकेत जावून आपल्या समस्या प्रशासनाच्या लक्षात आणून देवून त्यावर उपाययोजना राबवणे यासाठी काम करणे अपेक्षित असते. दुर्दैवाने आपल्या स्थानिक पश्चिम पट्ट्यातील नगरसेवकांना आपल्या जबाबदारीची जाणीव आणि भान नसल्याचे पाहायला मिळत आहे. पाण्यासारखी मूलभूत समस्या आपल्याला त्रासदायक ठरत असताना त्यांनी सदर महासभेत पुढील प्रश्न उपस्थित करणे गरजेचे होते. पाणी कधी मिळणार? किती पाणी मिळणार? घरोघरी पाणी मिळणार की सार्वजनिक नळाद्वारे? असे प्रश्न विचारणे अपेक्षित होते. पण आपले नगरसेवक ज्याच्या कृपेने निवडून आले आहेत त्यांना त्रास होईल असे वागायचे नाही भलेही ग्रामीण पट्ट्यात अजून १० वर्ष पाणी मिळाले नाही तर चालेल अशी भूमिका घेऊन चिडीचूप बसले होते. ग्रामीण भागातील असलेले उपमहापौर एकीकडे मुलाखत देऊन सांगतात की २०२५ पर्यंतची शहरात असलेल्या अनधिकृत बांधकामे, इमारती व चाळी यांना पाणी देणार. म्हणजे बाहेरचे, अनधिकृत आहेत त्यांना पाणी देणार पण पश्चिम पट्ट्यात पाणी देता येणार नाही कारण OC नाही त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार! असा दुटप्पी न्याय का? शहरातील अनधिकृत बांधकामे कोणाची आहेत ज्यांना पाणी देण्यासाठी यांना इतकी घाई लागली आहे, पण पिढ्यानपिढ्या राहणारे वसईकर मात्र पाणीसाठी तडफडत आहेत त्याचे या नगरसेवकांना काही देणेघेणे नाही त्यामुळे ही सर्व शांत बसून होते. एकाचीही प्रशासनाला जाब विचारण्याची हिंमत नाही. हे लोकांचे प्रश्न कसे सोडवणार? वॉर्ड क्रमांक २५ मधील नगरसेवक तर इतक्या गंभीर प्रश्नावर चर्चा असताना गैरहजर राहून आपल्याच स्थानिकांच्या जमिनी लुबाडण्यात व्यस्त असल्याचे समजले.आपले ग्रामीण भागातील नगरसेवक फक्त फोटोजीवी झाले आहेत. पावसाळा जवळ आला की महानगर पालिका असेही फांद्या छाटतात. ते त्यांचं कामच आहे. तर आपले नगरसेवक अशा ठिकाणी उभे राहून फोटो काढणार व जोर जोरात येणाऱ्या जाणाऱ्यांना हे कसे काम करतात हे दाखविणार! ह्या फोटोजीवी नगरसेवकांना इतकी साधी गोष्ट काळात नाही की, मागील काही वर्ष हे न्हवते तेव्हाही महानगर पालिका नियमानुसार रस्त्याच्या कडेचे फांद्या छाटत होते, पण यांना मिरविण्याची खूप हौस. आता नाले साफ करण्यासाठी गाडी येईल तेव्हा हे उभे राहून फार मोठे इंजिनिअर असल्यासारखे उभे राहून फोटो काढणार. मोठी गंमत म्हणजे कर्मचारी साधे खांबाचे बल्ब बदलायला येतात तेव्हा हे असे हातवारे करतात जसे यांना सर्व कळते. नगरसेवक आहेत की जोकर आहेत हेच लोकांना कळत नाही. लोक आपल्याला हसतात एवढे साधे आपल्या नगरसेवकांना काळात नाही. पश्चिम पट्ट्यातील नगरसेवकांनी लक्षात घ्या की, येत्या पावसाळ्यापर्यंत रस्ते खड्डे मुक्त झाले नाहीत व अपघात झाले तर आपल्या घरावर मोर्चा येणार हे नक्की. तसेच ३-४ वेळा पिण्याचे पाण्याचे पाईप टाकून झाले आहेत. आता पुढील २-३ महिन्यात पिण्याचे पाणी नाही मिळाले की लोकांचे आशीर्वाद घेण्यास तयार रहा.आपल्या येथे पाणी नाही तरी पाणीपट्टी, मलनिसारण व्यवस्था नाही तरी कर, शिक्षण व्यवस्था नाही याचा कर असे जी व्यवस्था आपल्या इथे नाही, त्याचा जबरदस्तीने कर वसूल केला जातो त्यावर तुम्ही गप्प का? आपले रस्ते खड्ड्यांनी भरले आहेत, आपली गटार व्यवस्था नाही, वीज पुरवठा खंडित होतो, हॉस्पिटल व आरोग्य सेवा नाही. जिल्हा परिषद शाळा कोसळत आहेत, सर्वत्र कचरा पडलेला आहे, बगीचे - मैदाने नाहीत. अश्या लोकांच्या खऱ्या व मूलभूत प्रश्नांवर आवाज उठवायला तुमची दातखिळी कशी बसते? लोकांच्या प्रश्नावर काम करा व आवाज उठवा नाहीतर तुमचा सत्कार लोक लवकरच करणार आहेत.-एलायस डिसिल्वा( नाळा)
------------------------------------**-------****-------------------

No comments:

Post a Comment

Thanks for your