देविदास केंगार यांच्या पाठपुराव्याला यश; महापौर अजीव पाटील यांच्या सहकार्याने विरार ग्रामीण रुग्णालयामध्ये दिव्यांगांसाठी ऐतिहासिक निर्णय – दर बुधवारी सर्व दिव्यांगांना दिव्यांग प्रमाणपत्र व UDID कार्ड वितरण सुरू - All India News Mulani . online

All India News Mulani . online

All India News Mulani


ऑल इंडिया न्यूज हिन्दी एवं मराठी में ऑनलाइन समाचार

33-0138922 नं .उदयम महा

All India News S M S कलेक्शन, भाईंदर ( ईस्ट ) BP रोड रेल्वे स्टेशन के बाजु में प्रशांत हॉटेल, सुरभी के सामने, मेडीकल के बाजु मे ( शाहरुख मुलाणी- mob.7021052733 ) . NEWS WEBSITE,, YouTube channel,, NGO,, संबंधित सभी सेवाएं प्रदान करते है , सेवाएं लेने के लिए व्हाट्सअप किजिए 7378342192, ZARA DIGITAL MARKETING

Editor : -Nazir Mulani con.8796706999

Nazir Mulani ऑल इंडिया न्यूज

Saturday, April 25, 2026

देविदास केंगार यांच्या पाठपुराव्याला यश; महापौर अजीव पाटील यांच्या सहकार्याने विरार ग्रामीण रुग्णालयामध्ये दिव्यांगांसाठी ऐतिहासिक निर्णय – दर बुधवारी सर्व दिव्यांगांना दिव्यांग प्रमाणपत्र व UDID कार्ड वितरण सुरू


दिनांक 25 एप्रिल 2026 (मुख्य संपादक -नजीर मुलाणी, वसई)
देविदास केंगार यांच्या पाठपुराव्याला यश; महापौर अजीव पाटील यांच्या सहकार्याने विरार ग्रामीण रुग्णालयामध्ये दिव्यांगांसाठी ऐतिहासिक निर्णय – दर बुधवारी सर्व दिव्यांगांना दिव्यांग प्रमाणपत्र व UDID कार्ड वितरण सुरू 
(नजीर मुलाणी, वसई)
विरार : अपंग जनशक्ती संस्थेचे अध्यक्ष देविदास जयवंत केंगार यांच्या सातत्यपूर्ण व ठोस पाठपुराव्यामुळे आणि महापौर अजीव पाटील यांच्या प्रभावी सहकार्यामुळे विरार ग्रामीण रुग्णालयात दिव्यांगांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक सेवा सुरू करण्यात आली आहे.

यानुसार, आता प्रत्येक बुधवारी विरार ग्रामीण रुग्णालयात सर्व दिव्यांग बांधवांना दिव्यांग प्रमाणपत्र तसेच UDID (Unique Disability ID) कार्ड देण्याची प्रक्रिया नियमितपणे राबविण्यात येणार आहे.

यापूर्वी या सेवेसाठी दिव्यांग नागरिकांना पालघर जिल्ह्यात जावे लागत होते. त्यामुळे त्यांना प्रवासाचा त्रास, आर्थिक खर्च आणि वेळेची नासाडी सहन करावी लागत होती. मात्र, या नव्या निर्णयामुळे आता स्थानिक स्तरावरच सर्व सेवा उपलब्ध झाल्याने दिव्यांग बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे.

देविदास केंगार यांच्या सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करत हा प्रश्न मार्गी लावला. महापौर अजीव पाटील यांनीही या विषयाची गांभीर्याने दखल घेत प्रशासनाशी समन्वय साधत या निर्णयाला गती दिली.

या उपक्रमामुळे अधिकाधिक दिव्यांग नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सहजपणे घेता येणार असून, परिसरातील दिव्यांगांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यातही दिव्यांगांच्या हक्कांसाठी आणि सुविधांसाठी असेच ठोस प्रयत्न सुरू ठेवण्यात येतील, असे देविदास केंगार यांनी सांगितले आहे.
------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Thanks for your