वसई तालुक्यात रेशनिंग प्रक्रियेत भ्रष्टाचार आणि धान्याचा काळाबाजार!
पुरवठा मंत्र्यांकडे लेखी तक्रार
(मुलाणी, वसई)
वसई : वसई तालुक्यामध्ये रेशनिंग कार्डाशी संबंधित कार्यालयीन कामकाज आणि सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार व अनियमितता सुरू असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. नवीन रेशनिंग कार्ड तयार करणे, नावांमध्ये दुरुस्ती किंवा नाव समाविष्ट करणे अशा कामांसाठी नागरिकांकडून पाच ते पंधरा हजार रुपयांपर्यंतची अवैध वसुली केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत राज्याचे पुरवठा मंत्री आणि संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून दोषींवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुरवठा विभागातील काही अधिकारी आणि त्यांचे खासगी प्रतिनिधी (रायटर) यांच्या संगनमताने हा पैशांचा खेळ सुरू असल्याचे आरोप नागरिकांनी केले आहेत. विशेष म्हणजे, अनेक पात्र लाभार्थ्यांची वैध रेशनिंग कार्डे कोणतीही पूर्वसूचना न देता ऑनलाइन प्रणालीमधून हटवण्यात आली आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबे धान्यापासून वंचित राहत आहेत. रेशन दुकानदारांना मिळणाऱ्या धान्याच्या साठ्यात तफावत असणे आणि काही ठिकाणी धान्याची चढ्या दराने विक्री होणे असे गैरप्रकारही समोर आले आहेत.
पूर्वी सेतू सुविधा केंद्रामार्फत ही सर्व प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडत होती, मात्र ती व्यवस्था बंद झाल्यापासून भ्रष्टाचाराला अधिक वाव मिळत असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. ही सुविधा पुन्हा सेतू केंद्रांमार्फत सुरू करून सर्वसामान्य जनतेची लूट थांबवावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
No comments:
Post a Comment
Thanks for your