दिनांक १मे२०२६वार शुक्रवार ( मुख्य संपादक- नजीर मुलाणी)
वसई विरार शहर महानगरपालिकेत ‘महाराष्ट्र दिन’ उत्साहात साजरा
(मुलाणी,वसई)
विरार :- महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आज दि.०१ मे, २०२६ रोजी वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालय तसेच सर्व प्रभाग समिती कार्यालयांमध्ये ‘महाराष्ट्र दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. महानगरपालिका मुख्यालयात मा.महापौर श्री.अजीव पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांमार्फत राष्ट्रगीत, ध्वजगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करण्यात आले तसेच प्रतिज्ञा घेण्यात आली.
याप्रसंगी मा.महापौर महोदयांनी केलेल्या आपल्या भाषणाच्या सुरुवातीस संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन केले. आजच्या या ऐतिहासिक दिनी, वसई-विरारच्या या क्रांतीभूमीवर महाराष्ट्र दिन साजरा करताना मला सार्थ अभिमान वाटत असून महाराष्ट्राची थोर संस्कृती, महान इतिहास आणि संतांची परंपरा जोपासणे हे आपल्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे मा.महापौर महोदयांची सांगितले. आज ‘महाराष्ट्र दिन’ सोबतच ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ सुद्धा आहे, एखादी इमारत उभी राहताना पायाचा दगड कधी दिसत नाही, पण संपूर्ण इमारतीचा भार तोच पेलत असतो. तसेच आपल्या शहराच्या प्रगतीचा भार आमचा कामगार वर्ग पेलत आहे. ‘कामगार’ हा राष्ट्राच्या प्रगतीचा खरा शिल्पकार असून त्याचा सन्मान म्हणजे राष्ट्राचा सन्मान आहे. आपल्या महानगरपालिकेचे नाव उज्ज्वल करण्यात, आपल्या शहराचा चेहरा मोहरा बदलण्यात आमच्या स्वच्छता कामगारांपासून ते सर्व कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. या कष्टकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि त्यांच्या कामाचा सन्मान राखणे, ही आपली केवळ प्रशासकीय नाही तर नैतिक जबाबदारी असल्याचे सांगत मा.महापौर महोदयांनी सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास मा.उप-महापौर श्री.मार्शल लोपीस, मा.माजी आमदार श्री.क्षितीज ठाकूर, मा.माजी महापौर श्री.राजीव पाटील, मा.माजी उप-महापौर श्री.सगीर डांगे, मा.सभागृह नेते श्री.प्रफुल्ल साने, मा.विरोधी पक्षनेते श्री.मनोज पाटील, सर्व सन्माननीय आजी-माजी नगरसेवक-नगरसेविका, मा.अतिरिक्त आयुक्त श्री.संजय हेरवाडे, मा.अतिरिक्त आयुक्त श्री.दिपक सावंत, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पत्रकार, मान्यवर नागरिक, पोलीस विभागातील कर्मचारी, शाळेचे शिक्षक, विद्यार्थी तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
---:::::::::::::::::::::::::--------:::::::::::::::::::::-------::-::::::::::-:::::::::::::::::::::::--
No comments:
Post a Comment
Thanks for your