वसई : - भिवंडी-कामण-चिंचोटी या ठाणे व पालघर या दोन जिल्ह्याना जोडणारा प्रमुख महामार्ग मागील दहा वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. परंतु ठेकेदाराचा मनमानीपणा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची हतबलता यामुळे हा रस्ता आता वाहन चालकांसाठी मृत्यूचा सापळा बनलेला आहे.
आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेश अध्यक्ष श्री समीर सुभाष वर्तक यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी भिवंडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात धडक दिली.
यावेळी उपभियंता श्री गिते यांना सोमवार दिनांक 26 मे 2025 रोजी सकाळी 10:00 वाजेपासून चिंचोटी येथे होणाऱ्या "रास्ता रोको" आंदोलनाचे पत्र देण्यात आले.
याप्रसंगी श्री समीर वर्तक यांच्यासोबत काँग्रेसच्या व्यापारी विभागाचे प्रदेश सरचिटणीस के. अश्रफ, पर्यावरण विभागाचे प्रदेश सरचिटणीस अम्मार पटेल, सेवादल चे प्रदेश सरचिटणीस परवेझ खान, पर्यावरण विभागाचे भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष नौशाद अन्सारी व वसई विरार शहर जिल्हा कमिटीचे जिल्हाध्यक्ष डेरीक फुर्टाडो, जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस संकेत वसईकर आणि संदेश भोईर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment
Thanks for your