वसई :- युद्धजन्य किंवा आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास नागरिकांनी कोणती सतर्कता बाळगावी, तसेच प्रशासनाने कोणती पावले उचलावी, यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. जिल्ह्यातील वसई शहरात हे मॉक ड्रिल घेण्यात आले. या मोहिमेला केंद्र सरकारकडून "ऑपरेशन अभ्यास" असे नाव देण्यात आले आहे.मॉक ड्रिलच्या वेळेत शासनाकडून सूचना मिळाल्यानंतर वसई येथे नागरी संरक्षण दलाचे सायरन वाजवून नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आला. नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे सांगण्यात आले. मॉक ड्रिल ही केवळ पूर्वतयारीचा भाग असून कोणतीही खरी आपत्ती उद्भवलेली नाही असे आवाहन नागरी संरक्षण दल यांच्या वतिने करण्यात आले.एयर स्ट्राईक, बॉम्ब हल्ल्याची सूचनासर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठीच्या सूचना धावाधाव, गडबड गोंधळ न करता नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविण्यात बाबत सुचना संबंधित परिसरात शोध मोहीम घेवून जखमी, अडकलेल्या नागरिकांची तात्काळ सुटका करणे, त्यांना प्रथमोपचार करणे, अशी कार्यवाही करण्यात आली. यावेळी भिवंडी महापालिकेचे मा .आयुक्त अशोककुमार रणखांब, नागरी संरक्षण दल तालुकाप्रमुख नरेंद्र सोलंकी, नागरी संरक्षण दलाचे रूचिता नाईक, शनि मंदिर ट्रस्टी व नागरी संरक्षण दलाचे किशोर नाईक, गणेश सुळे, सिध्देश्वर खैरे, मित नाईक उपस्थित होते.
==================================
No comments:
Post a Comment
Thanks for your