तब्बल ५ मिनिटं रुग्णवाहिकेचा रस्ता अडवला; सायरन, हॉर्न ऐकूनही रस्ता देईना
वसई:- शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांच्या मोफत रूग्णवाहिका सेवा देत असताना गोखिवरे येथे रूग्णवाहिका अडवण्याचा प्रयत्न मुजोर कारचारकाने केला आहे.
रूग्णाचा जीव वाचवण्यासाठी सायरन वाजवत गोखिवरे येथुन रस्त्यावरून वेगाने निघालेल्या रुग्णवाहिकेचा मार्ग अडवल्याची एक धक्कादायक घटना वसई येथे समोर आली आहे. हे अमानवी वर्तन करणाऱ्या चालकाविरोधात आता पोलिस कारवाईचा मोठा बडगा उगारणार का? गाडी क्रमांक MH 04 FF 5857 असुन या धक्कादायक घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा एक कारचालक दूरपर्यंत रस्ता अडवताना दिसत आहे. या घटनेत रुग्णवाहिकेच्या चालक समीर गोलांबडे सायरन सुरू असताना ही वारंवार हॉर्न वाजूनही तो कारचालक बाजूला हटला नाही. या प्रसंगी रुग्णावहिकेतील सहायकाने या घटनेचा व्हिडीओ बनवून व्हायरल केला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र पोलीस कारवाई करणार का ? याबाबत शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांनी कार चालकाचे वाहतुक परवाना रद्द करून दंड ठोठवण्याची मागणी केली आहे.
"===========≠======================
जाहिराती साठी संपर्क करें मो . नं .8796706999
No comments:
Post a Comment
Thanks for your