नालासोपारा ता, ६ :- नालासोपारा शहरातील विविध नागरी समस्यांवरून शिवसेना महिला आघाडी ने महापालिका सहाय्यक आयुक्त यांची भेट घेत लक्ष वेधले.पावसाळ्यापुर्वी करण्यात येणारी उपाययोजना, नालेसफाई, वाहतुक कोंडी,कचरा व्यवस्थापन, अनधिकृत बांधकाम, अनधिकृत फेरीवाले, प्लॅस्टीक पिशव्यांवरिल कारवाई आदी महत्वाचा मुद्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आले.नालासोपारा शहरातील दिवसेंदिवस वाढत असलेली अनधिकृत बांधकाम करून सर्वसामान्य नागरीकांची फसवणुक करणाऱ्या बांधकाम व्यवसायिक यांच्यावर तातडीने एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल करण्याबाबत तसेच अनधिकृत फेरिवाले यांच्यामुळे होणारी वाहतुक कोंडी,पावसाळ्यात होणारी पुरपरिस्थिती करण्यात येणारी उपाययोजना स्टेशन परिसरातील वाढलेले फेरिवाले, रस्त्यावरील असणारे झेब्रा क्राॅसिंग पट्यांचा अभाव, अशा विविध प्रश्नांवर चर्चा करत तातडीने ते सोडवण्याची मागणी यावेळी शिवसेना महिला आघाडीने केली.दरम्यान शिवसेना महिला आघाडीच्या या विविध मागण्यांवर महापालिका सहाय्यक आयुक्त अश्विनी मोरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. तसेच यापैकी अधिकाधिक समस्या येत्या काळात सोडवण्याचे आश्वासनही यावेळी त्यांच्याकडुन देण्यात आले.यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक शितल कदम, महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक उपशहर संघटक सोनल ठाकुर व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.....
=================================== नातेपुते ता. माळशिरस जि .सोलापूर
नातेपुते येथे काल संध्याकाळी 6 च्या दरम्यान घराच्या आंगणात अवकाळी पाऊस पडत असताना विज कोसळून महिलेचा मुत्यृ चे नाव - करिष्मा तांबवे
No comments:
Post a Comment
Thanks for your