वसई विरार शहर महानगरपालिका
दि.05/05/2025
वसई (प.) ते किल्लाबंदर व वसई (प.) ते भुईगाव मार्गांवर ई-बस सेवेचा शुभारंभ सोहळा संपन्न…
वसई : - वसई शहरातील नागरिकांसाठी वसई ते किल्लाबंदर आणि वसई ते भुईगाव या मार्गांवर मा. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा गुणवत्ता (NCAP) अंतर्गत प्राप्त निधीमधुन खरेदी केलेल्या ई-बस सेवेचे उद्घाटन सोहळा दि. 05 मे 2025 रोजी, सकाळी 11 वाजता प्रभाग समिती "एच"कार्यालयाशेजारी, वसई विधानसभा मतदार संघाच्या माननीय आमदार सौ. स्नेहाताई दुबे-पंडित मॅडम यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
सदर ई-बस सेवा ही पर्यावरणपूरक तंत्रज्ञानावर आधारित असून, स्वच्छ, सुरक्षित आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव नागरिकांना देणार आहे.
उद्घाटन प्रसंगी वसई-विरार शहर महानगरपालिकेचे मा. अतिरिक्त आयुक्त श्री. संजय हेरवाडे, उपायुक्त श्री. नानासाहेब कामठे, माजी नगरसेवक श्री. शेखर धुरी, माजी नगरसेवक श्री. किरण भोईर, श्री. महेश सरवणकर, सहायक आयुक्त सौ. संगीता घाडीगावकर, सहाय्यक आयुक्त श्री. विश्वनाथ तळेकर व इतर पदाधिकारी, नागरिक व महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सदर सोहळयात माननीय आमदार सौ. स्नेहाताई दुबे-पंडित यांनी त्यांनी केलेल्या सूचनेचे पालन केल्याबद्दल महानगरपालिकेचे मा.आयुक्त व सर्व अधिकारी वर्गाचे आभार व्यक्त केले. तसेच त्यांनी मागणी केलेल्या इतर मार्गांवरही लवकरात लवकर ई-बससेवा सुरु करावी अशी सूचना केली.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त श्री. विश्वनाथ तळेकर यांनी केले. मा. आमदार श्रीमती स्नेहा दुबे पंडित यांच्या शुभहस्ते वसई ते किल्लाबंदर व वसई ते भुईगाव या मार्गावर जाणाऱ्या ई-बस श्रीफळ वाढवून व बसला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आल्या. तद्नंतर मा. आमदार श्रीमती स्नेहा दुबे पंडित यांनी नागरिकांसमवेत बस मध्ये बसून ई-बस प्रवासाचा आनंदही घेतला.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. संतोष शिंदे यांनी केले.
मुख्य कार्यालय
वसई विरार शहर महानगरपालिका
==================================

जाहिराती साठी संपर्क करे मो . नं .8796706999
No comments:
Post a Comment
Thanks for your