सातारा,माण :- बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर नंतर आता रायगड जिल्ह्यासाठी देखील ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अॅन्ड ट्रेनिंग’ (CIIIT) ला केंद्र शासनाकडून मंजूरी मिळाली आहे. सुमारे १०५ कोटी खर्चाच्या या प्रकल्पासाठी ‘टाटा टेक्नॉलॉजीज’ कंपनीनं केंद्र मंजुरीचं पत्र माझ्याकडं सुपूर्त केलं असून सदरील अत्याधुनिक केंद्र रोहा एमआयडीसीमध्ये उभारण्यात येणार आहे. गेल्या चार महिन्यांमध्ये राज्यात मंजूर झालेलं हे चौथं केंद्र असून, पाठपुराव्यांनंतर केवळ दोन आठवड्यांत बीड जिल्ह्यातील, दीड महिन्यांत नांदेड व छत्रपती संभाजीनगरमधील दोन केंद्रे आणि आता रायगडमधील हे चौथं केंद्र मंजूर करण्यात आलं आहे.
या उपक्रमामुळं संबंधित चारही जिल्ह्यातील युवकांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं उद्योगसुलभ व रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. रोजगाराभिमुख, उद्योगक्षम कौशल्याचं प्रशिक्षण मिळणार आहे. तसंच स्थानिक स्तरावर कुशल मनुष्यबळ उपलब्ध होऊन उद्योगवाढीस चालना मिळणार आहे.
CIIIT प्रकल्पाच्या एकूण १०५ कोटी खर्चापैकी ८९ कोटी टाटा टेक्नॉलॉजीजकडून तर १६ कोटी राज्य शासन व जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या केंद्रामार्फत रायगड आणि कोकणातील युवकांना जागतिक दर्जाचं प्रशिक्षण, आधुनिक तांत्रिक कौशल्ये, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी प्राप्त होतील. या केंद्राच्या माध्यमातून कोकणातील स्टार्टअप्स व नवउद्योगांना प्रोत्साहन मिळेल आणि संपूर्ण औद्योगिक परिसंस्थेला बळकटी मिळेल, असा मला विश्वास आहे.
==================================
तसेच माण तालुका खुटबाव गाव येथे ही कार्यालय लवकरच होणार तसेच आपल्या शहरातील बातम्या व व्हिडीओ पाठवू शकता मो . नंबर वर -8796706999
No comments:
Post a Comment
Thanks for your