बॉस्को सामाजिक विकास संस्था वाळवंडा यांच्या मार्फत तीन महिन्याचे शिवण काम प्रशिक्षण शिबीर पूर्ण - All India News Mulani

All India News Mulani

All India News Mulani

मुस्लिम निकाह के लिए आज ही रजिस्ट्रेशन करे इस वेब साइट पर muslimnikah.onlin , अच्छे रिश्ते मिलेंगे इस साइट पर सबसे सस्ता वेबसाइट है ये कम पैसे में अच्छा रिश्ता मिलेगा

ऑल इंडिया न्यूज हिन्दी एवं मराठी में ऑनलाइन समाचार

33-0138922 नं .उदयम महा

All India News S M S कलेक्शन, भाईंदर ( ईस्ट ) BP रोड रेल्वे स्टेशन के बाजु में प्रशांत हॉटेल, सुरभी के सामने, मेडीकल के बाजु मे ( शाहरुख मुलाणी- mob.7021052733 ) . NEWS WEBSITE,, YouTube channel,, NGO,, संबंधित सभी सेवाएं प्रदान करते है , सेवाएं लेने के लिए व्हाट्सअप किजिए 7378342192, ZARA DIGITAL MARKETING

Editor : -Nazir Mulani con.8796706999

Nazir Mulani ऑल इंडिया न्यूज

Tuesday, June 17, 2025

बॉस्को सामाजिक विकास संस्था वाळवंडा यांच्या मार्फत तीन महिन्याचे शिवण काम प्रशिक्षण शिबीर पूर्ण

 दि . १७ जून २०२५ वार - मंगळवार [ मुख्य संपादक - नजीर मुलाणी ] वसई 
जव्हार , प्रतिनिधी :-सोमनाथ टोकरे 
 दि. १७ जव्हार पासून १४ की मी अंतरावर असलेली ग्रुप ग्रामपंचायत कौलाळे येथील ,विक्रम बागुल सर,आणी काजल मॅडम .यांनी महिलांना शिवण कोर्स बद्दल माहिती दिली व शिवण कोर्स साठी मंजुरी घेतली. बॉस्को सामाजिक विकास संस्था वाळवंडा .ता जव्हार.जि,पालघर. यांच्यामार्फत ५ मार्च ते १२ जून २०२५ या कालावधीत एकूण तीन महिन्याचे शिवणकाम प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. डॉन बॉस्को सामाजिक संस्था कडून प्रशिक्षणार्थी महिलांना ९० दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल दिनांक:१६ जुन २०२५ रोजी निरोपसमारंभ व प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम घेण्यात आला . सरपंच वैशाली अशोक धोडी तसेच बॉस्को समाजिक संस्थेचे उप संचालक ,मा.ब्रदर सविओ डिमेलो यांच्या हस्ते ३४ महिलांना संस्थेचे प्रमाणपत्र देण्यात आले + NSDC नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेट लिमिटेड शासनाचं प्रमाणपत्र देण्यात येईल. निरोप सभारंभ कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे कौलाळे लोकनियुक्त सरपंच वैशालीताई धोडी मॅडम यांनी बास्को सामाजिक सेवा संस्था पूर्ण टिमचे व शिवण काम प्रशिक्षक यांचे मनःपूर्वक आभार मानले व प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना मार्गदर्शन करून महिलांना शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित डॉन बॉस्को सामाजिक संस्थेचे उपसंचालक ब्रदर सेवीओ डिमोलो, कॉर्डिनेटर चंदू कदम, विक्रम बागुल, पराग महाले, काजल वाघचौरे, शिवणकाम प्रशिक्षक विजय भोरे सर, अशोक धोडी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.*कोट*...,. जव्हार तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून डॉन बॉस्को सामाजिक संस्था वाळवंडा ही आरोग्य, सामाजिक,कृषी, शैक्षणिक, असे विविध प्रोजेक्ट वरती काम करते परंतु कौलाळे ग्रामपंचायत मधील महिलांना प्रशिक्षण मिळावे यासाठी मागणी केली असून तेआमच्या मागणीला विनंती देऊन कौलाळे ग्रामपंचायत मध्ये प्रथम तीन महिन्याचे प्रशिक्षण आज पूर्ण होत आहे त्याबद्दल सर्व संस्थेचे पूर्ण टीमचे आभारी व्यक्त करते...........*वैशाली धोडी.सरपंच ग्रामपंचायत कौलाळे* *कोट*..... डॉन बॉस्को सामाजिक संस्था वाळवंडा यांनी आमच्या ग्रुप ग्रामपंचायत कौलाळे आदिवासी पाड्यात महिलांसाठी शिवणकाम प्रशिक्षण दिल्याबद्दल मी संस्थे चे व संचालक मा. फादर जेसू रॉबिनशन .यांचे आभारी आहे. तसेच आम्हाला लाभलेले प्रशिक्षक विजय भोरे सर यांनी अतिशय साध्या भाषेत चांगल्या प्रकारे प्रशिक्षण दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार . विजय सर तुमची खूप आठवण येईल आम्हाला . भविष्यात स्वतःच्या पायावर शिवणकाम च्या माध्यमातून आमच्या परिवाराला हातभार लागेल तसेच आम्ही स्वतःच्या पायावर उभे राहू. --------
आशा प्रवीण भोये प्रशिक्षणार्थी
*कोट*...... 
ज्या वेळेस बॉस्को सामाजिक संस्थे कडून मला सूचना दिल्या की शिवणकाम प्रशिक्षण कौलाळे ग्रामपंचायत मध्ये घेण्याच्या विचार केला परंतु थोडीशी मनामध्ये भीती होती कामाच्या दिवसांमध्ये महिलांचा प्रतिसाद भेटतो की नाही परंतु तीन महिन्याच्या प्रशिक्षण कालावधीत एकूण ३४ सहभाग नोंदवून आज प्रशिक्षण पूर्ण केले.सर्व महिला आणी मुलींनी वेवस्तीत समजून घेतलं आणी मला सहकार्य केल्या बद्दल आभारी आहे . तसेच ग्रुप ग्रामपंचायत कौलाळे सरपंच वैशाली धोडी मॅडम यांनी प्रशिक्षण घेण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल मी ग्रामपंचायतचा आभारी आहे.----*विजय भोरे शिवणकाम प्रशिक्षक
=================================

No comments:

Post a Comment

Thanks for your