नातेपुते पोलीसांची धडक कारवाई – टायर चोर अटकेत, चोरीस गेलेला 2.04 लाखांचा मुद्देमाल जप्त - All India News Mulani

All India News Mulani

All India News Mulani


ऑल इंडिया न्यूज हिन्दी एवं मराठी में ऑनलाइन समाचार

33-0138922 नं .उदयम महा

All India News S M S कलेक्शन, भाईंदर ( ईस्ट ) BP रोड रेल्वे स्टेशन के बाजु में प्रशांत हॉटेल, सुरभी के सामने, मेडीकल के बाजु मे ( शाहरुख मुलाणी- mob.7021052733 ) . NEWS WEBSITE,, YouTube channel,, NGO,, संबंधित सभी सेवाएं प्रदान करते है , सेवाएं लेने के लिए व्हाट्सअप किजिए 7378342192, ZARA DIGITAL MARKETING

Editor : -Nazir Mulani con.8796706999

Nazir Mulani ऑल इंडिया न्यूज

नातेपुते पोलीसांची धडक कारवाई – टायर चोर अटकेत, चोरीस गेलेला 2.04 लाखांचा मुद्देमाल जप्त

 दि . 27 सप्टेंबर 2025 वार - शनिवार [ मुख्य संपादक - नजीर मुलाणी ]
(मुलाणी )
नातेपुते (ता. माळशिरस, जि.सोलापूर), 27 सप्टेंबर 2025नातेपुते पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केलेल्या धडक कारवाईत वाहनाचे टायर चोरून नेणाऱ्या अट्टल चोरास अटक करून 2 लाख 4 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांत पोलिसांबद्दल समाधान व विश्वास वाढला आहे.फिर्यादीकडील तक्रार फिर्यादी आकाश तानाजी बोडरे (रा. नातेपुते) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे वाहन टाटा टिपर (क्र. MH 11 CH 0551) उभे असताना अज्ञात चोरट्याने दोन टायर डिस्कसह, किंमत सुमारे 75,000 रुपये, चोरून नेले होते. या घटनेवरून नातेपुते पोलीस ठाण्यात गु.र.नं. 331/2025, भा.दं.वि. कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.तपासाची धडाडीघटनेनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच सायबर शाखेच्या तांत्रिक माहितीचे विश्लेषण केले. त्यातून संशयित आरोपी हा बुरान इलाही मुलानी (वय 40, रा. कडेगाव, जि. सांगली) असल्याचे निष्पन्न झाले.यानंतर आरोपीस पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचून कडेगाव येथे अटक केली. सुरुवातीला आरोपीने उडवा-उडवीची उत्तरे दिली. मात्र, सखोल चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.मुद्देमाल हस्तगतपोलिस कोठडीत चौकशीदरम्यान आरोपीकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यात –दोन टायर डिस्कसह (किंमत ₹75,000)चोरीसाठी वापरलेली लाल रंगाची झेन कारटायर उचलण्यासाठी वापरलेला जॅकनट-बोल्ट काढण्यासाठी मशीनअसा एकूण ₹2,04,000/- किमतीचा माल हस्तगत करण्यात आला.सदर आरोपीवर यापूर्वीही आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे.तपास अधिकारी व समाधानया गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सत्यवान पाटकुलकर हे करीत असून, फिर्यादी आकाश बोडरे यांनी पोलीसांनी केलेल्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले आहे.वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि पथकाची कामगिरीही कामगिरी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण श्री. अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. प्रितम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अकलूज श्री. संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक श्री. महारुद्र परजने, गुन्हे प्रकटीकरण विशेष पथकातील सहायक पोलिस फौजदार श्रीकांत निकम, पोलिस नाईक राकेश लोहार, दत्ता खरात, सहाय्यक पोलिस फौजदार सत्यवान पाटकुलकर, सुभाष गोरे, सचिन चव्हाण, मनोज शिंदे, रंजीत मदने, तसेच सायबर शाखेचे जुबेर तांबोळी यांनी विशेष मेहनत घेतली.
 ही धडक कामगिरी नातेपुते पोलिसांच्या दक्षतेचे व तपासातील काटे कोरपणाचे प्रत्यंतर देणारी ठरली असून, नागरिकांनी पोलिसांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
--------------------------------------------