आक्रोशाला न्याय: संतोष पागी कुटुंबाला अखेर मिळाले धान्य!
वर्षभराच्या लढ्यानंतर वंचितांना मिळाला हक्काचा शिधा
आंदोलनाच्या ताकदीसमोर प्रशासन झुकले
दि . २७ सप्टेंबर २०२५ वार - शनिवार [ मुख्य संपादक - नजीर मुलाणी ]
( मुलाणी , वसई )
वसई : - आदिवासी कुटुंबाच्या हक्कासाठी केलेल्या ठाम लढ्याला यश मिळाले आहे. संतोष पागी या आदिवासी कुटुंबाला गेल्या वर्षभरापासून रास्तभाव धान्य दुकानाने अन्यायकारकपणे धान्य देण्यास नकार दिला होता. या गंभीर प्रकरणाचा पर्दाफाश करत लोकशाही महिला संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वसई अन्नपुरवठा अधिकारी भागवत सोनार यांच्या दालनात धडक देत आंदोलन छेडले.
आंदोलनाच्या तीव्रतेसमोर अखेर प्रशासनाला झुकावे लागले. दुकान दाराविरोधात कारवाईचे आश्वासन अन्नपुरवठा अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर चळवळीचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
बुधवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी सकाळी लोकशाही महिला संघटनेच्या तालुका सचिव काॅ. मथुरा भोईर, काॅ. पवित्रा थापड यांच्यासह पदाधिकारी थेट सोपारा चक्रेश्वर तलाव येथील धान्य दुकानात दाखल झाले. या वेळी गेल्या वर्षभराचे थकीत धान्य संतोष पागी यांच्या हातात सुपूर्द करण्यात आले.
हा विजय फक्त संतोष पागी कुटुंबाचा नाही तर हक्कहिन प्रत्येक वंचिताचा विजय असल्याचे लोकशाही महिला संघटनेने जाहीर केले. आता संबंधित दुकान दारावर कठोर कारवाई होईपर्यंत संघटना आंदोलन उभे करेल, अशी आक्रमक भूमिका याप्रसंगी जाहीर करण्यात आली.
--------------------------------------------
No comments:
Post a Comment
Thanks for your