(मुलाणी )
म्हसवड (ता. माण, जि. सातारा) –म्हसवड पोलीस ठाण्याच्या पथकाने अवघ्या 24 तासांत ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा उघडकीस आणत तीन चोरट्यांना गजाआड केले. रहिमतपूर (ता. कोरेगाव) येथील आरोपींकडून तब्बल 19 लाख 50 हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टरसह मुद्देमाल जप्त करण्यात आला.तक्रारदार गणेश शंकर ढाणे (रा. पाडळी, जि. सातारा) यांचा जॉईनडियर कंपनीचा 5210 मॉडेलचा हिरव्या रंगाचा ट्रॅक्टर (क्र. MH 11 DN 9042) टँकरसहित चोरीला गेल्याची तक्रार म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तत्परतेने तपास सुरू करून गुन्हे प्रकटीकरण पथकाला सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचे निर्देश दिले.सदर तपासा दरम्यान 50 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा मागोवा घेतला असता आरोपी ट्रॅक्टरसह जात असल्याचे स्पष्ट झाले. ट्रॅक्टरसोबत टँकर असल्याने वाहनाचा वेग कमी असल्याने आरोपींनी टँकर रस्त्यातच सोडून दिला आणि फक्त ट्रॅक्टर घेऊन पळ काढला. तांत्रिक विश्लेषण आणि सततच्या शोध मोहिमेनंतर हा ट्रॅक्टर रहिमतपूर येथे आढळून आला.अटक आरोपींची नावे पुढीलप्रमाणे :
1. गौरव भागवत पवार
2. शिवराज नानासो पंडित
3. संदीप बाळकृष्ण कदम
सदर आरोपींकडून चोरी केलेला ट्रॅक्टर, गुन्ह्यात वापरलेले ओमनी वाहन व इतर साहित्य जप्त करण्यात आले असून तिघांनाही अटक करण्यात आली आहे. न्यायालयीन पोलीस कोठडीसाठी त्यांना हजर करण्यात आले असून त्यांचा इतर गुन्ह्यांमध्येही सहभाग असल्याचे उघड झाले आहे.या जलदगती तपासामुळे तक्रारदारासह स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.ही कामगिरी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय अधिकारी रणजीत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, नीता पळे, राजेंद्र कुंभार, राहुल थोरात, युवराज खाडे, विकास ओंबासे या कर्मचाऱ्यांचा विशेष सहभाग राहिला.
--------------------------------------------
No comments:
Post a Comment
Thanks for your