छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य अभियानांतर्गत सेवा पंधरवडा : पालघर जिल्ह्यात वसई तहसिलदार कार्यालय लोकोपयोगी उपक्रमांना वेग, - All India News Mulani

All India News Mulani

All India News Mulani


ऑल इंडिया न्यूज हिन्दी एवं मराठी में ऑनलाइन समाचार

33-0138922 नं .उदयम महा

All India News S M S कलेक्शन, भाईंदर ( ईस्ट ) BP रोड रेल्वे स्टेशन के बाजु में प्रशांत हॉटेल, सुरभी के सामने, मेडीकल के बाजु मे ( शाहरुख मुलाणी- mob.7021052733 ) . NEWS WEBSITE,, YouTube channel,, NGO,, संबंधित सभी सेवाएं प्रदान करते है , सेवाएं लेने के लिए व्हाट्सअप किजिए 7378342192, ZARA DIGITAL MARKETING

Editor : -Nazir Mulani con.8796706999

Nazir Mulani ऑल इंडिया न्यूज

छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य अभियानांतर्गत सेवा पंधरवडा : पालघर जिल्ह्यात वसई तहसिलदार कार्यालय लोकोपयोगी उपक्रमांना वेग,

 दि . 30 सप्टेंबर २०२५ वार - मंगळवार [ मुख्य संपादक - नजीर मुलाणी ]
(नजीर मुलाणी , वसई )
पालघर, वसई : - दि. 30 सप्टेंबर :छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य अभियानाचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत "राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा" पालघर जिल्ह्यात उत्साहात राबविला जात आहे. जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड(भा.प्र.से) यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शासकीय विभागांच्या समन्वयातून या पंधरवड्यात लोकसहभागातून उपयुक्त प्रकल्पांवर भर देण्यात आला आहे.शिवपाणंद रस्ते व ग्रामीण रस्ते उपक्रमपानंद रस्त्यांचे सर्वेक्षण व नोंदणी करून नकाशावर नसलेले रस्ते समाविष्ट करणे.शेत रस्ते तयार करताना लागून असलेल्या शेतकऱ्यांची संमतीपत्रे घेणे.रस्ता अदालतांचे आयोजन करून प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे.शेत रस्त्यांची मोजणी व सिमांकन करणे.ग्रामीण रस्त्यांलगत दुतर्फा वृक्ष लागवड करणे.सर्व नोंदी अभिलेखात समाविष्ट करून पारदर्शकतेसाठी समितीमार्फत (उपविभागीय अधिकारी अध्यक्ष) देखरेख केली जाणार आहे.
सर्वांसाठी घरे शासकीय जागांवरील रहिवासी कब्जे हक्काने प्रधान करण्याची मोहीम.
नियमाप्रमाणे ग्रामीण भागातील अतिक्रमणाचे नियमितीकरण.
समिती अध्यक्षतेखाली उपविभागीय अधिकारी हे कामकाज पाहणार आहेत.
नाविन्यपूर्ण उपक्रम सार्थक : सेवा दूत प्रणालीद्वारे घरपोच दाखले वाटप, 
शाळांमधून थेट प्रमाणपत्र वितरण, तसेच "आपले सरकार सेवा केंद्रांचे" मूल्यमापन.संकल्प : वनहक्क दावे व अपिलांची निर्सग-आधारित नियामक निर्णय प्रक्रिया, डिजिटल सॅटेलाईट इमेजद्वारे वनदाव्यांचे परीक्षण,
 वनपट्ट्यावर वृक्ष लागवड, तसेच आयुष्मान भारत कार्ड वाटप.
सुलभ : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ब्लॉकचेन आधारित भूसंपादन प्रणालीचा अवलंब.
समर्थ : जिल्ह्यातील कोळेवाड्यांच्या जागांचे सर्वेक्षण व नोंदणीची प्रक्रिया.
लोकसहभागावर भरया सेवा पंधरवड्यात नागरिकांना शासनाच्या सेवांचा प्रत्यक्ष लाभ घ्यावा, तसेच ग्रामविकासाच्या कामांत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी केले आहे. शासनाच्या या अभियानात पालघर जिल्हा विभागाने अधिकाधिक सहभाग नोंदवून विकास उपक्रम गती द्यावी, ‌असे त्यांनी विशेषत -नमूद केले