✍️ संपादकीय लेख : -
(नजीर मुलाणी )
वसई : - आजचा समाज झपाट्याने बदलत आहे. माहिती तंत्रज्ञान, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि ऑनलाईन माध्यमामुळे लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पण या प्रवाहातही समाजातील सुरक्षा, न्याय आणि सत्य हे तीन घटक महत्वाचे राहिले आहेत. आणि ही तीन जबाबदारी सांभाळतात – पोलीस, वकील आणि पत्रकार.
पोलीस – सुरक्षिततेचा आधार
गुन्हे रोखणे, कायदा-सुव्यवस्था राखणे आणि नागरिकांचा विश्वास जपणे हे पोलीस दलाचे प्रमुख कार्य आहे. लोक अडचणीत सापडले की पहिल्यांदा पोलीसच धावून येतात. त्यामुळे पोलिसांवरचा विश्वास हा लोकशाहीचा पहिला टप्पा आहे.
वकील – न्यायाचा मार्गदर्शक
कायद्याची भाषा सामान्य माणसाला समजणं कठीण असतं. वकील त्याचा आधार बनतो. गरीब, दुर्बल आणि पीडित लोकांना कायद्याच्या आधारे न्याय मिळवून देणे, त्यांच्या हक्कांसाठी लढणे हे वकिलांचे समाजाप्रती मोठे योगदान आहे.
पत्रकार – सत्याचा प्रहरी
पत्रकार सारखे निडर पत्रकार अन्याय आणि भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवतात. ते समाजातील समस्या लोकांसमोर आणतात आणि प्रशासनाला जबाबदार धरतात. सत्य, पारदर्शकता आणि लोकजागृती ही पत्रकारांची खरी ताकद आहे.
निष्कर्ष
आज लोकशाही टिकवण्यासाठी पोलीस, वकील आणि पत्रकार हे तिन्ही आधारस्तंभ परस्परपूरक ठरत आहेत.
१ )पोलीस लोकांना सुरक्षा देतात
२ )वकील लोकांना न्याय मिळवून देतात
३ )पत्रकार लोकांना सत्य पुरवतात
या तीन स्तंभांच्या प्रामाणिक कामगिरीमुळेच समाज अधिक सुरक्षित, न्यायप्रिय आणि जागरूक बनतो.
--------------------------------------------
दु:खद निधन…💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐
वसई ,खुटबाव : - वडूज (ता. खटाव)
येथील माजी सैनिक विष्णूपंत कृष्णाजी गोडसे उर्फ दादा (वय ९६) यांचे आज सकाळी निधन झाले.
अंत्यविधी आज दुपारी ३ वाजता वडूज येथे होणार आहे.
दादांचा खटाव तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अनिलभाऊ गोडसे यांचे वडील,
श्री स्वामी समर्थ मंदिर समितीचे अध्यक्ष शरदचंद्र गोडसे व सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर गोडसे यांचे चुलते असा मान्यवर परिवार आहे.
त्यांच्या निधनाने वडूजसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
🙏 आदरणीय दादांना ऑल इंडिया न्यूज तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
No comments:
Post a Comment
Thanks for your