(वसई -नजीर मुलाणी )
वसई : सर डी. एम. पेटीट सरकारी रुग्णालयात नर्स व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे रुग्णांना गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आपत्कालीन परिस्थितीत योग्य वेळी उपचार न मिळाल्याने रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याची तक्रार समोर आली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)चे मीडिया प्रमुख व ऑल इंडिया रिपोर्टर - नजीर मुलाणी यांनी सांगितले की, “मी स्वतः उपचारासाठी रुग्णालयात गेलो असता एका महिलेला साप चावल्याचे प्रकरण होते; परंतु तातडीच्या उपचारासाठी नर्स (कमतरता भारली )उपलब्ध नसल्याने तिच्या जीवाला धोका निर्माण झाल्यासारखे वाटले. याचप्रमाणे कुत्र्याने चावा घेतलेल्या एका मुलालाही त्वरित उपचार मिळण्यात उशीर झाला. तसेच पोलीस अधिकारी आरोपी यांना ही मेडिकल साठी घेवून येतात त्यांना ही ताटकळत बसावे लागते ( डॉक्टर यांची वाट पहात बसावे लागते ) .”नजीर मुलाणी यांनी महानगरपालिका आयुक्त व मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवाहन केले की, रुग्णालयात तातडीने नर्स व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, जेणेकरून आपत्कालीन रुग्णांना योग्यवेळी उपचार मिळू शकतील आणि जीव धोक्यात येणार नाही.स्थानिक नागरिकांनीही या मागणीला पाठिंबा देत रुग्णालयातील सुविधांचा दर्जा सुधारावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
--------------------------------------------