(मुलाणी , खुटबाव )
दहिवडी :- दहिवडी ता. माण, जि. सातारा)गोंदवले बुद्रुक येथील प्राजक्ता वाघमोडे यांचा मोबाईल माणदेशी ग्राउंड, दहिवडी येथून गहाळ झाला होता. या घटनेची माहिती मिळताच दहिवडी पोलिसांनी तत्परतेने शोधमोहीम राबवून मोबाईल शोधून काढला (दहिवडीचे पोलीस स्टेशन चे मुख्य अधिकारी दत्तात्रय दराडे साहेब जनते च्या कंप्लेटी वर जातीने लक्ष देवून त्यांचे अधिकारी ही न्याय देण्याचे नेहमी काम करत असतात ) आणि तो त्यांच्या ताब्यात दिला.मोबाईल परत मिळाल्यानंतर प्राजक्ता वाघमोडे यांनी निलेश कुदळे यांचा सत्कार करून दहिवडी पोलीस स्टेशनचे मनःपूर्वक आभार मानले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये पोलीस प्रशासना विषयी विश्वास अधिक दृढ झाला असून, पोलिसांच्या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
--------------------------------------------
No comments:
Post a Comment
Thanks for your