(मुलाणी, खुटबाव )
म्हसवड : - (ता. माण, जि. सातारा) :काळचौंडी ते झरे जाणाऱ्या रस्त्यावर काळचौंडी घाटाजवळ दुपारी दिड ( 1:30 )च्या सुमारास तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ( दि . 2 / 10 / 2025 रोजी ) या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने आरोपींना चार दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे.घटनेचा तपशील :फिर्यादी साजन अरुण चव्हाण (वय 24, रा. काळचौंडी, ता. माण, जि. सातारा) हे आपल्या मामाच्या मोटारसायकल वरून जांभुळणी येथील भोजलिंग मंदिराकडे जात असताना काळचौंडी गावातील ओळखीचे आरोपी इर्टिगा कारमधून आले व त्यांनी मोटारसायकल आडवी मारून चव्हाण यांना थांबविले.यानंतर सुरेश नामदेव सावंत याने लोखंडी रॉडने तरुणाच्या डोक्यावर, हातावर व पायावर वार करून गंभीर जखमी केले. कैलास माने याने काठीने मारहाण केली तर प्रतिक माने याने दगडाने छातीत वार केला. याशिवाय साहिल माने व सत्यवान माने यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. भाऊसाहेब विठोबा माने याने ही शिवीगाळ करत “ह्याला मारा” असा उद्गार काढत हल्ल्यास प्रवृत्त केले.दाखल गुन्हा :या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गु.र.नं. 317/2025 भा.दं.संहिता (BNS) कलम 118(2), 115(2), 352, 351(2)(3), 189(1)(2), 191(2)(3), 190, 126(2) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.(भेट देणारे अधिकारी : - सपोनि अक्षय सोनवणे )अटक व कस्टडी :सदर आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे. पुढील तपास पोहवा जे.डी. लुबाळ हे करीत आहेत .
No comments:
Post a Comment
Thanks for your