(मुलाणी , खुटबाव )
दहिवडी, वरकुटे : - सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील वरकुटे येथील तुपेवाडी येथे शहाजी दाजी तुपे (वय 65) यांनी त्यांच्या शेतात गांजाची बेकायदेशीर लागवड केल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा, सातारा व म्हसवड पोलीसांनी संयुक्तपणे छापा टाकला.छाप्यात एकूण 40 गांजाची झाडे (40.478 किलो, किंमत ₹10,11,950) जप्त करण्यात आली. आरोपी शहाजी तुपे यांच्यावर NDPS कायद्यानुसार गुन्हा क्रमांक 327/2025 नोंदवण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री .तुषार दोषी, डॉ. वैशाली कडुकर अप्पर पोलीसअधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अरुण देवकर, रोहीत फार्णे सपोनि , विश्वास शिंगाडे पोउनि, परितोष दातीर पोउनि , म्हसवड पो. स्टेशन चे अक्षय सोनवणे यांच्या पथकांनी केली.अभियानात स्थानिक गुन्हे शाखा व म्हसवड पोलीस स्टेशनचे अधिकारी वअनिल वाघमोडे पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अतिश घाडगे, शिवाजी गुरव, सचिन साळुंखे ,सनी आवटे, अमित सपकाळ, गणेश कापरे ,स्वप्नील कुंभार, धीरज महाडिक ,म्हसवड पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार अमर नारनवर, शशिकांत खाडे, रूपाली फडतरे, अभिजीत बहाद्दुले, राहुल थोरात, वसीम मुलाणी व तसेच फॉरंन्सिक पथकाने सहभाग घेतला. सर्व पथकांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.