(मुलाणी , खुटबाव )
दिनांक : 12 ऑक्टोबर 2025, सोलापूर ,नातेपुते : - नातेपुते परिसरात अजूनही माणुसकी टिकून असल्याचे ज्वलंत उदाहरण समोर आले आहे. येथे एका बेवारस व्यक्तीच्या मृतदेहावर स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेऊन विधिवत अंत्यसंस्कार केल्याची घटना घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, फलटण–पंढरपूर महामार्गावरील नातेपुते बायपासजवळील साईड पट्टीत सुमारे 55 ते 60 वर्षे वयाच्या अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती अर्जुन हरिबा पिसाळ (वय 43, रा. जानकर वस्ती, नातेपुते) यांनी 11 ऑक्टोबर 2025 रोजी पोलीस ठाण्यात दिली.प्राथमिक चौकशीत हा इसम चार ते पाच दिवसांपूर्वीपासून परिसरात वेडसर अवस्थेत फिरताना दिसून आल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच नातेपुते पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. परजणे यांनी घटनास्थळी भेट देऊन आवश्यक ती कारवाई केली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री. पाटकुलकर पुढील तपास करत आहेत.मयताच्या शरीरातून दुर्गंधी पसरली असतानाही स्थानिक नागरिक श्री. देविदास कैलास चांगण, राजू बापू लोंढे, अर्जुन हरीबा पिसाळ, आणि ज्ञानेश्वर माने यांनी माणुसकीचे दर्शन घडवत दफनभूमीत त्या बेवारस मयतावर विधिवत अंत्यसंस्कार केले.या कार्यात जयश्री शंकर अटक, राहुल हरी सोरटे, आणि पोलीस कॉन्स्टेबल अमोल देशमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभले.ही घटना नातेपुते परिसरातील माणुसकीचे अनोखे उदाहरण ठरली आहे --------------------------------------------