(नजीर मुलाणी , वसई )
वसई (दि. 16 ऑक्टोबर 2025) — वसई-विरार शहर महानगरपालिका माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने आज दुपारी 1.00 वाजता पालिकेच्या मुख्यालयात (चौथा मजला, सभागृह, विरार-पश्चिम) महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.या पत्रकार परिषदेअंतर्गत “नमस्ते नॅशनल ॲक्शन फॉर मेकॅनाइज्ड सॅनिटेशन इकॉनॉमी सिस्टीम” योजनेची जिल्ह्यातील अंमलबजावणी तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि त्यावरील उपाय योजना याबाबत चर्चा होणार आहे.या बैठकीस मा. श्री. शेरसिंग रुक्कानसिंग डागोर, अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा), महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग, चेंबूर, मुंबई हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत.महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागाने सर्व प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.स्थळ: वसई-विरार शहर महानगरपालिका मुख्यालय, चौथा मजला, सभागृह, विरार (प.)
वेळ: दुपारी 01.00 वाजता
दिनांक: 16 ऑक्टोबर 2025 - प्रभारी जनसंपर्क अधिकारी, वसई-विरार
शहर महानगरपालिका
--------------------------------------------