दि . १० ऑक्टोंबर २०२५ वार - शुक्रवार [ मुख्य संपादक - नजीर मुलाणी ]
(मुलाणी , वसई )
मुंबई :- सामाजिक प्रतिष्ठा आणि सन्मानासाठी डीएड शिक्षकांचा लढा तीव्रबृहन्मुंबई मनपा माध्यमिक विभागात ग्रामीण महाराष्ट्रातून नियुक्त झालेल्या गुणवत्ताधारक डीएड शिक्षकांवर अन्याय व अवहेलना सुरूच असल्याचा आरोप शिक्षकांमधून होत आहे.डीएड शिक्षकांची ही लढाई केवळ पगार किंवा वेतनश्रेणीची नाही, तर सामाजिक प्रतिष्ठा आणि सन्मान पुन्हा मिळविण्याची आहे, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. प्रमुख मुद्दे :1. 2009 पासून पदवीधर वेतनश्रेणीपासून वंचित — अपदवीधर प्रशिक्षित शिक्षकांनी पदवी व बीएड करूनही अन्याय. 2. पगार रोखण्याची धमकी देऊन 9वी–10वी वर्गात नियमबाह्य समायोजन.3. बीएड शिक्षकांना 6वी–8वीसाठी ठेवून डीएड शिक्षकांकडून 9वी–10वीचे अध्यापन. 4. एसएससी बोर्ड परीक्षेत प्रशिक्षणाशिवाय उत्तरपत्रिका तपासणी — विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ. 5. डीएड शिक्षकांना बेकायदेशीरपणे प्रभारी मुख्याध्यापक पदाचा भार. 6. काही शिक्षकांकडून कारकूनासारखी ऑनलाइन कामे करून घेणे.7. 2008–2012 पर्यंतच्या भरतींची बिंदूनामावली अनुपलब्ध — पारदर्शकतेचा अभाव.8. सेवाजेष्ठता यादी आणि पात्र शिक्षकांची नावे जाहीर करावी अशी मागणी.9. पदवीधर वेतनश्रेणी पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावी.10. अतिरिक्त डीएड शिक्षकांचे समायोजन प्राथमिक शाळांसारखे करावे. शिक्षकांची मागणी :शिक्षण विभागाने डीएड शिक्षकांची सेवाजेष्ठता यादी, तसेच पदवीधर वेतनश्रेणी पात्रता वर्षानुसार जाहीर करून न्याय द्यावा. “ही लढाई फक्त वेतनाची नाही, आमच्या सन्मानाची आहे” — डीएड शिक्षक बांधव