(मुलाणी )
म्हसवड -दिनांक : 08 ऑक्टोबर 2025 ठिकाण : हिंगणी, ता. माण, जि. सातारा म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घरात चारित्र्यावर संशयातून पत्नीचा खून करून पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.घटनेचे तपशील:मौजे हिंगणी (ता. माण, जि. सातारा) येथे दिनांक 07 ऑक्टोबर रोजी रात्री 10.00 वाजल्यापासून ते 08 ऑक्टोबर सकाळी 6.00 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. आरोपी बंडु अंकुश घुटुकडे (रा. हिंगणी) याने आपल्या पत्नी अनिता बंडु घुटुकडे हिच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्या डोक्यात लाकडी दांडा असलेल्या लोखंडी घनाने प्रहार करून तिचा जागीच खून केला. त्यानंतर आरोपीने स्वतः विष प्राशन करून रबरी पट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.या प्रकरणी फिर्यादी ज्ञानेश्वर वस्ताद झिमल (वय 31, रा. गंगोती, ता. माण, जि. सातारा) यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. हा गुन्हा BNS कलम 103(1) अंतर्गत नोंदवण्यात आला आहे.तपास अधिकारी:सपोनि सोनवणे (मो. 9970717712), म्हसवड पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शना खाली पुढील तपास सुरू आहे.वरिष्ठ अधिकारी भेट:मा. रणजित सावंत (उपविभागीय पोलीस अधिकारी, दहिवडी विभाग, कँप वडुज) यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाची माहिती घेतली. ही घटना परिसरात मोठ्या चर्चेचा विषय ठरली असून म्हसवड पोलीस ठाण्याकडून पुढील तपास सुरू