(वसई, मुलाणी)
:वसई पोलीस ठाणे, मीरा-भाईंदर वसई- विरार पोलीस आयुक्तालय येथे मिसिंग ग. मि. नं. 23/2025 प्रमाणे, दिनांक 08 जून 2025 रोजी एक तरुण बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.बेपत्ता तरुणाचे नाव -राजा मनोहर गांगडे (वय 22 वर्षे) असून तो चौबारे रोड, हमी क्लासेस जवळ, चौबारे रोड, वसई पश्चिम, तालुका वसई, जिल्हा पालघर येथे राहतो.त्याचा रंग सावळा, केस बारीक व काळे, कपाळ मोठे, कानात बाळी, उंची अंदाजे पाच फूट आहे. बेपत्ता होताना त्याने गुलाबी रंगाचा टी-शर्ट आणि खाकी रंगाची पॅन्ट परिधान केली होती. त्याला मराठी व हिंदी भाषा बोलता येते.दिनांक 12 जून 2025 रोजी सकाळी अकराच्या सुमारास "बोटीवर कामाला जातो" असे सांगून घरातून बाहेर पडला, मात्र तो अद्याप पर्यंत घरी परतलेला नाही.या प्रकरणी वसई पोलिसांनी मिसिंगची नोंद केली असून, सदर इसमचा शोध सुरू आहे. नागरिकांना तो दिसल्यास तात्काळ वसई पोलीस ठाणे वसई गाव किल्ला रोड येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.