(नजीर मुलाणी, वसई)
वसई:- विरार शहरातील खड्डेमय रस्त्यांच्या प्रश्नावर अखेर जनतेचा रोष उसळला असून, बहुजन विकास आघाडी तर्फे आज विरार महानगरपालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.हा मोर्चा माजी महापौर प्रवीण शेट्टी यांच्या पत्राच्या आधारे म्हणजेच लेखी निवेदनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आला आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे, तसेच अनेक अपघात घडत असल्याने आज या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बहुजन विकास आघाडी रस्त्यावर उतरली आहे. मोर्चाची सुरुवात वसई डी-मार्ट येथून दुपारी तीन वाजता होणार असून, हा मोर्चा माजी नगरसेवक,सभापती - अफिफ जमील शेख यांच्या आदेशानुसार काढण्यात येणार आहे. वसई कोळीवाडा आणि वसई गाव परिसरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.संध्याकाळी पाच वाजता विरार महानगरपालिका मुख्यालयावर हा मोर्चा पोहोचणार असून, तेथे प्रशासनाला लेखी निवेदन देण्यात येणार आहे.मोर्चाचा उद्देश स्पष्ट आहे —प्रशासन “सरकारला जागे करा, जनतेशी खेळ खेळू नका!”खड्ड्यांमुळे अपघात होऊन नागरिकांना जीव गमवावा लागतो, या अन्यायाविरुद्ध बहुजन विकास आघाडी प्रशासनाकडे जाब विचारणार आहे.जनतेच्या हितासाठी व रस्त्यांवरील सुरक्षिततेसाठी हा मोर्चा ऐतिहासिक ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
--------**-----------***---*------------
No comments:
Post a Comment
Thanks for your