(मुलाणी )
नालासोपारा ता,२४ :- शिवसेना महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक यांच्या ३ वर्षाच्या कार्यकाळाचा ५० पानांचा "कर्तव्यपूर्ती कार्य अहवाल" प्रकाशित करण्यात आले.शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांच्या हस्ते "कर्तव्यपूर्ती कार्य अहवाल" प्रसिद्ध करण्यात आले.नालासोपारा पश्चिम प्रभाग क्रमांक ११ मधुन शिवसेना पक्षाच्या वतिने रूचिता नाईक यांनाच उमेदवारी देण्याचे आश्वासन मिलिंद देवरा यांनी दिले यासंदर्भात मी श्रीकांत शिंदे यांना हि मी कळवले असुन तसेच नालासोपारा पश्चिम मध्ये भव्य "शिवसेना जनसंपर्क कार्यालय" उध्दघाटन श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.नालासोपारा शहरात विविध विकासकामांच्या माध्यमातून एकमेव स्मशानभूमीत लाकडे ठेवण्यासाठी शेड बांधले, वसई तालुक्यातील नागरीकांसाठी २४ तास मोफत रूग्णवाहिका सेवा देत शेकडो रूग्णांचे प्राण वाचवण्यात आले, युवती महिलांसाठी मोफत शिवणकाम,मेहंदी,ब्युटी पार्लर, केक मेकींग, हॉटेल मॅनेजमेंट, बँकीग कोर्सेस मोफत संगणक प्रशिक्षण च्या माध्यमातुन १५०० युवती महिलांना मोफत प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचे मोलाचे कार्य रूचिता नाईक यांच्या माध्यमातून करण्यात आले. दिव्यांग बांधवांना दर महिण्याला मोफत साहित्य वाटप, पेन्शन, दिव्यांग प्रमाणपत्र शेकडो नागरीकांना मोफत काढुन देण्यात येतात.मोठ्या आजारांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया, दर महिन्याला विविध आरोग्य शिबीर शस्त्रक्रिया शिबिराच्या माध्यमातून २०० नागरीकांचे मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रिया, महिला संघटनेची बांधणी अशा विविध कार्याचे शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी कार्याचे कौतुक केले.माझ्यावर ठेवलेला हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी सदैव काम केले आहे. आपण मला प्रेम, आदर आणि माया दिली याबद्दल मी आपली शतशः ऋणी आहे'.रूचिता नाईक यांच्या ५० पानांचा कार्याचा हा अहवाल लवकरच डिजिटल स्वरुपात त्यांची वेबसाईट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करणार आहे. याबाबत, नागरिकांनी प्रतिक्रिया जरूर कळवाव्यात, असे आवाहन ही रूचिता नाईक यांनी यावेळी केले. यावेळी विभाग प्रमुख निलेश शिंदे, शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते