दि . १३ / ११ / २०२५ वार -गुरुवार [ मुख्य संपादक - नजीर मुलाणी ]
( मुलाणी , खुटबाव )
दहिवडी - (ता. माण, जि. सातारा)
दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी घडलेल्या एका दुर्दैवी अपघातात सशस्त्र पोलीस दल मरोळ, मुंबई येथे कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल महादेव भानुदास कोकरे (वय 35 वर्षे, रा. कोकरेवाडी, ता. माण, जि. सातारा) यांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेवरी ते दहिवडी रस्त्यावर मुळीक वस्ती जवळ, दहिवडी गावाच्या हद्दीत, दुपारी सुमारास 4 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोटारसायकलचा अपघात झाला. या अपघातात कोकरे यांच्या तोंड व छातीला गंभीर दुखापत झाली होती.
घटनास्थळावरून स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्यांना ग्रामीण रुग्णालय दहिवडी येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, सायंकाळी अंदाजे 5 वाजता डॉक्टरांनी तपासून त्यांना पूर्वमृत घोषित केले.
पोलीस तपास आणि कार्यवाही
या घटनेची नोंद दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मयत रजिस्टर क्रमांक 44/2025 अंतर्गत करण्यात आली असून, बी.एन.एस.एस. कलम 194 प्रमाणे पुढील तपास सुरू आहे.
या घटनेचा पंचनामा सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. दत्तात्रय दराडे (मो. 9420025780) यांनी केला.
तपास अधिकारी म्हणून पो. हवा. ब. नं. 908/खांडेकर (मो. 84080 17838) कार्यरत आहेत, तर नोंद पो. हवा. 1988/आर. एस. गाढवे (मो. 81085 80088) यांनी केली आहे.
--------------------------------------------
ऑल इंडिया न्यूज मुलाणी .ऑनलाइन
दिनांक: 13 नोव्हेंबर 2025
स्थान: खुटबाव, ता. माण जि. सातारा