दहिवडी रोडवर दुर्दैवी अपघात; दुचाकीवरून पडून व्यक्तीचा मृत्यू* - All India News Mulani . online

All India News Mulani . online

All India News Mulani


ऑल इंडिया न्यूज हिन्दी एवं मराठी में ऑनलाइन समाचार

33-0138922 नं .उदयम महा

All India News S M S कलेक्शन, भाईंदर ( ईस्ट ) BP रोड रेल्वे स्टेशन के बाजु में प्रशांत हॉटेल, सुरभी के सामने, मेडीकल के बाजु मे ( शाहरुख मुलाणी- mob.7021052733 ) . NEWS WEBSITE,, YouTube channel,, NGO,, संबंधित सभी सेवाएं प्रदान करते है , सेवाएं लेने के लिए व्हाट्सअप किजिए 7378342192, ZARA DIGITAL MARKETING

Editor : -Nazir Mulani con.8796706999

Nazir Mulani ऑल इंडिया न्यूज

Thursday, March 26, 2026

दहिवडी रोडवर दुर्दैवी अपघात; दुचाकीवरून पडून व्यक्तीचा मृत्यू*

दिनांक 26 मार्च 2026 वार गुरुवार ( मुख्य संपादक- नजीर मुलाणी )
(मुलाणी ,खुटबाव)👆 स्कॅन करा न्यूज पहा 

*दहिवडी रोडवर दुर्दैवी अपघात; दुचाकीवरून पडून व्यक्तीचा मृत्यू*
सातारा (माण तालुका)शेवरी:-माण तालुक्यातील शेवरी ते दहिवडी रोडवर शिंगाडे वीटभट्टी शेजारी झालेल्या दुर्दैवी अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संपत जोतिबा गलंडे (वय 55 वर्ष, रा. शेवरी, ता. माण, जि. सातारा) हे दिनांक 25 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5.30 वाजता टीव्हीएस विक्टर (क्रमांक MH 11 CM 6627) या दुचाकीवरून प्रवास करत असताना अचानक तोल जाऊन रस्त्यावर पडले. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद (रजि. नं. 14/2026) बी.एन.एस.एस. कलम 194 अन्वये करण्यात आली आहे. फिर्यादी म्हणून त्यांच्या पत्नी शुभांगी संपत गलंडे (वय 38 वर्ष) यांनी तक्रार दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच पंचनामा (इनक्वेस्ट) व पोस्टमॉर्टम प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार खांडेकर हे करत आहेत.

No comments:

Post a Comment

Thanks for your