(नजीर मुलाणी ,वसई)
वसई विरार - रस्ते, फुटपाथ व गटार कामे वेळेत आणि दर्जेदार करण्याचे महापौरांचे निर्देशवसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाची आढावा बैठक मंगळवार, दि.१० मार्च २०२६ रोजी महापौर अजीव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महापौर दालनात संपन्न झाली. बैठकीत शहरातील रस्ते, फुटपाथ, गटार बांधकाम तसेच विविध पायाभूत सुविधांशी संबंधित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.यावेळी शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती, नवीन रस्ते बांधकाम, पादचाऱ्यांसाठी सुरक्षित फुटपाथ उभारणी तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गटार आणि नाल्यांची दुरुस्ती व स्वच्छता या कामांना प्राधान्य देण्याबाबत चर्चा करण्यात आली. शहरातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सर्व कामे नियोजनबद्ध पद्धतीने व निश्चित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मूलभूत सुविधांची उभारणी आणि देखभाल अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगत प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत तसेच सुरू असलेली कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. तसेच विविध विकासकामांच्या निविदा, मंजुरी आणि देयकांची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याबाबतही अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या.नागरिक तसेच नगरसेवकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करून त्या वेळेत निकाली काढाव्यात, असेही बैठकीत सांगण्यात आले. पावसाळ्यापूर्वी गटार व नाल्यांची स्वच्छता पूर्ण करून पाणी तुंबण्याच्या समस्या टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावरही भर देण्यात आला.या बैठकीस उपमहापौर मार्शल लोपीस, स्थायी समिती सभापती प्रविण शेट्टी, सभागृह नेते प्रफुल्ल साने, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त दिपक सावंत, प्रभारी शहर अभियंता प्रदीप पाचंगे तसेच सर्व नगरसेवक, कार्यकारी अभियंते, उप-अभियंते, कनिष्ठ अभियंते व महानगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
No comments:
Post a Comment
Thanks for your