(मुलाणी, वसई)
वसई :-वसई विरार शहर महानगरपालिका परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई सुरु आहे. दिनांक ०६/०३/२०२६ रोजी प्रभाग समिती ‘जी’ वालीव अंतर्गत प्रभाग सहा.आयुक्त श्री.निलेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण विभागामार्फत रेंज ऑफीस – भोईदापाडा नाका, रेंज ऑफीस – फादरवाडी नाका परिसर व मुख्य रस्त्यावर अनधिकृतपणे बसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येऊन अनधिकृतपणे उभारलेल्या स्टॉल, टपऱ्यांवर जेसीबीच्या मदतीने तोडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण ३५ टपऱ्या, २४ पत्राशेड, १५ बांबू शेड निष्कासीत करण्यात आले. त्याचप्रमाणे प्रभाग समिती ‘बी’ अंतर्गत प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील राधाकृष्ण हॉटेल परिसर, नागिनदास पाडा, मोरेगाव, मनवेलपाडा तलाव, कारगील नगर परिसरातील व मुख्य रस्त्यावरील अनधिकृतपणे उभारलेले स्टॉल, टपऱ्यांवर जेसीबीच्या मदतीने तोडक कारवाई करण्यात आली. यावेळी प्रभाग सहा.आयुक्त श्रीम.अलका खैरे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण विभागामार्फत अनधिकृत टपऱ्या व स्टॉल पूर्णपणे तोडण्यात आले व परिसर मोकळा करण्यात आला. या कारवाईत एकूण ५२ टपऱ्या, १२ हातगाड्या, ०८ शेड निष्कासीत करण्यात आले. प्रभाग समिती ‘एच’ नवघर-माणिकपूर अंतर्गत वसई पश्चिमेकडील वसई स्टेशन परिसर, आनंद नगर मार्केट परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर प्रभाग सहा.आयुक्त श्री.हरेश्वर पाटील यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण विभागामार्फत कारवाई करण्यात येऊन परिसर मोकळा करण्यात आला. या कारवाईत एकूण ०८ टपऱ्या, ०३ हातगाड्या निष्कासीत करण्यात आले. वरीलप्रमाणे अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाई महानगरपालिकेमार्फत सुरूच राहणार असून शहरातील नागरिकांना ये-जा करण्यास तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या फेरीवाल्यांविरुद्ध महानगरपालिकेमार्फत नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे सर्व फेरीवाल्यांनी सार्वजनिक रस्ते, ठिकाणे, पदपथांवर अडथळा निर्माण होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. असे आवाहन मा.आयुक्त श्री.मनोजकुमार सूर्यवंशी(भा.प्र.से.) यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment
Thanks for your