मान.महापौर यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील वाहतूक कोंडीच्या नियोजना संदर्भात महानगरपालिका मुख्यालयात बैठक संपन्न - All India News Mulani . online

All India News Mulani . online

All India News Mulani


ऑल इंडिया न्यूज हिन्दी एवं मराठी में ऑनलाइन समाचार

33-0138922 नं .उदयम महा

All India News S M S कलेक्शन, भाईंदर ( ईस्ट ) BP रोड रेल्वे स्टेशन के बाजु में प्रशांत हॉटेल, सुरभी के सामने, मेडीकल के बाजु मे ( शाहरुख मुलाणी- mob.7021052733 ) . NEWS WEBSITE,, YouTube channel,, NGO,, संबंधित सभी सेवाएं प्रदान करते है , सेवाएं लेने के लिए व्हाट्सअप किजिए 7378342192, ZARA DIGITAL MARKETING

Editor : -Nazir Mulani con.8796706999

Nazir Mulani ऑल इंडिया न्यूज

Saturday, March 7, 2026

मान.महापौर यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील वाहतूक कोंडीच्या नियोजना संदर्भात महानगरपालिका मुख्यालयात बैठक संपन्न

दिनांक 7/3/2026 वार-शनिवार (मुख्य संपादक -नजीर मुलाणी ,वसई )मो.नं.8796706999
 (मुलाणी, वसई)
वसई :- शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या (ट्रॅफिक) नियोजना संदर्भात महानगरपालिका मुख्यालयात मा.महापौर श्री.अजीव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील मुख्य रस्त्यावर, रेल्वे स्टेशन जवळ, चौक तसेच विविध रहदारीच्या ठिकाणांवर होत असलेल्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर योग्य त्या विविध उपाययोजना करून वाहतूक कोंडी सोडविण्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करणे, नागरिकांना सुरक्षित व सुलभ प्रवास सुविधा उपलब्ध करून देणे, फेरीवाल्यांविषयी योग्य त्या उपाययोजना करणे आणि भविष्यातील वाहतूक गरजा लक्षात घेऊन प्रभावी उपाययोजना राबविण्याबाबत मा.महापौर महोदयांनी उपस्थित शासकीय विभागांना सूचना दिल्या. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम व सुटसुटीत करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश मा. महापौर यांनी यावेळी दिले. या बैठकीत शहरातील रहदारीच्या ठिकाणी अनधिकृतपणे बसणाऱ्या व नागरिकांना ये-जा करण्यास अडथळा निर्माण करणाऱ्या फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करणे, प्रमुख चौकांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, सिग्नल व्यवस्थेचे आधुनिकीकरण, पार्किंग व्यवस्थेचे नियोजन, तसेच वाहतूक शिस्तीबाबत जनजागृती करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. याशिवाय शाळा, महाविद्यालये व बाजारपेठ परिसरातील वाहतूक नियंत्रणासाठी विशेष नियोजन करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. बैठकीत सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, नागरिकांना अधिक सुकर आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न असल्याचे तसेच अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध दररोज कारवाई करण्यात येत असल्याचे यावेळी मा.आयुक्त श्री.मनोजकुमार सूर्यवंशी (भा.प्र.से.) यांनी यावेळी सांगितले. बैठकीत ट्रॅफिक नियोजन करणे बाबत कशा प्रकारे उपाययोजना करणे योग्य राहील याबाबतच्या नियोजनाचे व्हिडिओ द्वारे सादरीकरण उपस्थितांना दाखविण्यात आले. या बैठकीला मा.महापौर श्री.अजीव पाटील, मा.उप-महापौर श्री.मार्शल लोपीस, मा.स्थायी समिती सभापती श्री.प्रविण शेट्टी, मा.आयुक्त श्री.मनोजकुमार सूर्यवंशी (भा.प्र.से.), माजी परिवहन सभापती श्री.भरत गुप्ता, अतिरिक्त आयुक्त श्री.संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त श्री.दिपक सावंत, प्र.शहर अभियंता श्री.प्रदीप पाचंगे, पोलीस उप-आयुक्त श्री.सुहास बावचे, वाहतूक शाखा विरार पोलीस निरीक्षक श्री.महेश शेट्टे, महानगरपालिका परिवहन व्यवस्थापक श्री.धैर्यशील जाधव, महानगरपालिका सचिव श्री.विश्वनाथ तळेकर, नगररचनाकार श्रीम.श्वेता माने, महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Thanks for your