वसई विरार शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग दि.०६/०३/२०२६ (१४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी HPV लसीकरण मोहीम) - All India News Mulani . online

All India News Mulani . online

All India News Mulani


ऑल इंडिया न्यूज हिन्दी एवं मराठी में ऑनलाइन समाचार

33-0138922 नं .उदयम महा

All India News S M S कलेक्शन, भाईंदर ( ईस्ट ) BP रोड रेल्वे स्टेशन के बाजु में प्रशांत हॉटेल, सुरभी के सामने, मेडीकल के बाजु मे ( शाहरुख मुलाणी- mob.7021052733 ) . NEWS WEBSITE,, YouTube channel,, NGO,, संबंधित सभी सेवाएं प्रदान करते है , सेवाएं लेने के लिए व्हाट्सअप किजिए 7378342192, ZARA DIGITAL MARKETING

Editor : -Nazir Mulani con.8796706999

Nazir Mulani ऑल इंडिया न्यूज

Saturday, March 7, 2026

वसई विरार शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग दि.०६/०३/२०२६ (१४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी HPV लसीकरण मोहीम)

दिनांक 7/3/2026 वार शनिवार ( मुख्य संपादक नजीर मुलाणी ,वसई )मोबाईल नंबर 8796706999
(मुलाणी,वसई )
वसई :- केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दिनांक, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते HPV लसीकरण मोहिमेचा राष्ट्रीय स्तरावर शुभारंभ करण्यात आला. त्यानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये *दि.८ मार्च २०२६ रोजी,* *महिला दिनाचे* औचित्य साधून राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात येणार आहे.वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत *१४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी* HPV (Human Papillomavirus) लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश भविष्यात होणाऱ्या *गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून (Cervical Cancer) मुलींना संरक्षण देणे* हा आहे."एचपीव्ही लसीकरण हे सर्व्हिकल कॅन्सर टाळण्यासाठी अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी उपाय आहे. किशोरवयात लस घेतल्यास भविष्यात या कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी करता येतो. या मोहिमेत गार्डासील ही लस पात्र मुलींना देण्यात येणार असून ती एकच डोस स्वरूपात दिली जाईल.*एचपीव्ही (HPV) म्हणजे काय ?*एचपीव्ही म्हणजे 'हयुमन पॅपिलोमाव्हायरस' हा एक अत्यंत सामान्य विषाणू आहे. गर्भाशय मुखाचा कर्करोग होण्यामागे ९५ टक्क्यांहून अधिक प्रकाणामध्ये या विषाणूचा संसर्ग कारणीभूत आढळतो.*नोंदणी आणि कुठे मिळणार लस?*महानगरपालिकेच्या *२१ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामधून मोफत* उपलब्ध राहील. तसेच यू-विन प्रणालीद्वारे नोंदणी करता येईल. लसीकरणाचा लाभ घेतलेल्या सर्व मुलींना प्रमाणपत्र देण्यात येईल.या कार्यक्रमाअंतर्गत १४ वर्षे पूर्ण झालेल्या सर्व मुलींना जवळच्या सर्व *नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये* (UPHC) मोफत HPV लस देण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित वयोगटातील मुलींच्या पालकांनी आपल्या मुलींना निश्चित तारखेत व वेळेत नजीकच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन HPV लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन वसई विरार शहर महानगपालिका वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. HPV लस सुरक्षित व प्रभावी असून ती भविष्यात गर्भाशयाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळवण्यास महत्वाची मदत करते.वैद्यकीय आरोग्य विभाग वसई विरार शहर महानगरपालिका

No comments:

Post a Comment

Thanks for your